For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळावर मिळाले जीवन निर्माण करणारे रसायन

06:36 AM Apr 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगळावर मिळाले जीवन निर्माण करणारे रसायन
Advertisement

नासाच्या क्यूरियोसिटी रोव्हरचा शोध

Advertisement

नासाचा रोव्हर क्यूरियोसिटी मंगळ ग्रहावर संचार करत असताना एका साधारण खडकावर चढला, जेव्हा 899 किलो वजनाच्या या रोव्हरने त्या नरम खडकाला चिरडले, तेव्हा आतून पिवळ्या रंगाचे क्रिस्टल बाहेर पडले. हे क्रिस्टल शुद्ध सल्फरचे (एलिमेंटल सल्फर) होते, ज्यांना सामान्य भाषेत ब्रिमस्टोनही म्हटले जाते.

मंगळावर सल्फेट यापूवीर्ही मिळाले होते, परंतु शुद्ध सल्फेटचा हा पहिला पुरावा आहे. हा शोध अत्यंत चकित करणारा असल्याने वैज्ञानिक आता त्याला अधिक समजून घेत आहेत.

Advertisement

कुठे मिळाला हा खजिना?

हा खडक गेडिज व्हॅली चॅनेल नावाच्या ठिकाणी मिळाला. हे ठिकाण मंगळावर एका जुन्या नदीचे चॅनेल असून जेथे अब्जावधी वर्षांपूर्वी पाणी वाहत होते. रोव्हर जेव्हा या चॅनेलमध्ये पुढे जात असताना त्याने या खडकाला चिरडले होते. आसपासचे अनेक खडक हे बाहेरून सामान्य वाटत होते, परंतु आत शुद्ध सल्फर असू शकते. वाळवंटात ओएसिस शोधण्यासारखी ही गोष्ट असल्याचे वक्तव्य क्यूरियोसिटी प्रकल्पाचे वैज्ञानिक एशविन वासवदा यांनी केले आहे.

सल्फेट अन् शुद्ध सल्फरमध्ये फरक

सल्फेट हे असे मीठ आहे, जे पाण्यात विरळणाऱ्या सल्फरद्वारे निर्माण होते. जेव्हा पाणी आटते, तेव्हा हे सल्फेट मागे राहते. मंगळावर पाण्याचा इतिहास समजून घेण्यासाठी सल्फेट अत्यंत मदत करतात. परंतु शुद्ध सल्फर निर्माण करण्यासाठी अत्यंत खास परिस्थिती हवी असते. वैज्ञानिकांना या क्षेत्रात अशा परिस्थिती दिसून आल्या नाहीत. तरीही सल्फरचे इतके मोठमोटे तुकडे पृष्ठभागावर आहेत. याचा अर्थ मंगळाच्या भूवैज्ञानिक इतिहासात खूप मोठे रहस्य दडलेले आहे, जे अद्याप आम्हाला कळलेले नाही.

सल्फर जीवनासाठी का आवश्यक ?

सल्फर जीवनासाठी आवश्यक घटक आहे, हे दोन  आवश्यक एमीनो अॅसिड निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे. जे प्रोटीनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. मंगळावर सल्फेट असल्याचे पूर्वीपासून माहित होते, याचमुळे जीवनाच्या शक्यतेच्या दिशेने ही नवी माहिती देत नाही, परंतु तरीही मंगळावर पाणी, रसायन आणि जीवनासाठी उपयुक्त गोष्टी वारंवार मिळत आहेत. मंगळ कधीकाळी जीवनासाठी उपयुक्त राहिले असावे हे यातून कळते.

रोव्हरने कसे शोधले?

क्यूरियोसिटीकडे इतकी शक्तिशाली उपकरण आहेत की ते खडकांचे विश्लेषण करू शकते. परंतु जर रोव्हर त्या खडकाला ठेचू शकला नसता तर बहुधा दीर्घकाळापर्यंत शुद्ध सल्फरचा शोध लागू शकला नसता. आता वैज्ञानिक मॉडेलिंग करून हा सल्फर तेथे कसा पोहोचला हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. क्यूरियोसिटी अद्यापही गेडिज व्हॅली चॅनेलमध्ये पुढे सरकत आहे. यामुळे आणखी आश्चर्यकारक शोध लागण्याची शक्यता आहे. हा शोध मंगळ ग्रहाला समजून घेण्याच्या दिशेने एक नवा अध्याय खुला करतो. क्यूरियोसिटीसारखा रोव्हर मंगळ केवळ लाल वाळवंट नाही, तर तेथेही रसायने आणि खनिजांचा स्वत:चा इतिहास असल्याचे आम्हाला दाखवून देतोय.

Advertisement
Tags :

.