For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हिन्सेंटवरील आजीवन बंदी शिथिल

06:22 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
व्हिन्सेंटवरील आजीवन बंदी शिथिल
Advertisement

वृत्तसंस्थ/ वेलिंग्टन

Advertisement

2014 साली न्यूझीलंडचा माजी सलामीचा फलंदाज लोयु व्हिन्सेंटवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने घातलेली आजीवन बंदी शिथिल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या शिस्तपालन समितीने व्हिन्सेंटवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान व्हिन्सेंटला राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटमध्ये खेळता यावे यासाठी या समितीने ही बंदी शिथिल केली आहे. क्रिकेट शिस्तपालन आयोगासमोर या प्रकरणाची चर्चा झाली आणि व्हिन्सेंटला करण्यात आलेल्या शिक्षेमध्ये फेरबदल करण्याचा निर्णयाला मान्यता मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (आयसीसी), न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आणि न्यूझीलंड क्रिकेटपटू संघटनेतर्फे व्हिन्सेंटच्यावतीने क्रिकेट शिस्तपालन आयोगाकडे विनंती अर्ज सादर करण्यात आला होता. 2014 च्या कालावधीत व्हिन्सेंटकडून अनेक गुन्हे झाले होते. त्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार विरोधी नियमाचा 18 वेळा भंग केल्याने त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 45 वर्षीय व्हिन्सेंटला आता स्थानिक, राष्ट्रीय, व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांना आपली उपस्थिती दर्शविता येईल, तसेच तो प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होऊ शकतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.