For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीत धर्मगुरु अन् बाबांचाच बोलबाला

05:21 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीत धर्मगुरु अन् बाबांचाच बोलबाला
Advertisement

काही मतदारसंघात ‘मठाधीश’च उमेदवार : धर्मगुरुंचे आशीर्वाद घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये चढाओढ

Advertisement

राजस्थान समवेत 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांना अनेक प्रकारच्या मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. राजकीय पक्षांकडून अनेक धर्मगुरुंनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर काही धर्मगुरुंच्या अनुयायांना स्वत:च्या बाजूने वळविण्यासाठी नेते हे धार्मिक बाबांच्या अवतीभवती घुटमळत आहेत. राजस्थानात तर अनेक धर्मगुरु आणि बाबा निवडणूक लढवत आहेत. मध्यप्रदेशात कथावाचकांचा मोठा प्रभाव दिसून येत असल्याने नेते त्यांच्या चरणी लीन होत आहेत. छत्तीसगडमध्ये देखील विविध धर्मगुरु आणि मठाधीश निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

निवडणूक येताच नेत्यांना मंदिर आणि धार्मिक बाबांची आठवण होऊ लागते.   राजस्थानात नाथ संप्रदायाचे महंत आणि अल्वरचे खासदार बाबा बालकनाथ हे निवडणूक लढवत आहेत. अल्वरच्या तिजारा मतदारसंघात ते भाजपचे उमेदवार आहेत. तर सिरोहीमध्ये देवासी धर्मगुरु ओटाराम देवासी सिरोही हे भाजपचे उमेदवार आहेत. देवासी हे 2018 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. देवासी समुदाय त्यांना धर्मगुरु मानतो.

Advertisement

अनेक मतदारसंघांमध्ये प्रभाव

अशाच प्रकारे जैसलमेरच्या पोखरण विधानसभा मतदारसंघात महंत प्रजापत पुरी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या वतीने धर्मगुरु सालेह मोहम्मद देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सालेह मोहम्मद हे फकीर परिवाराच्या नावाने प्रसिद्ध असून सीमा क्षेत्रात त्यांचा खास प्रभाव आहे. श्रीगंगानगर आणि हनुमानगढ दोन्ही जिल्ह्यांमध्ये सिरसाच्या सच्चा सौदा डेराचे बाब राम रहिमचा मोठा प्रभाव आहे. विशेषकरून सादुल शहर, गंगानगर, हनुमानगढ, पीलीबंगा, संगरिया आणि नोहरमध्ये त्यांचे लाखो अनुयायी आहेत.

मध्यप्रदेशातही धर्मगुरुंचा दबदबा

मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गडा गावचे रहिवासी पंडित धीरेंद्र शास्त्राr यांना मध्यप्रदेशच्या राजकीय वर्तुळघ्त सर्वाधिक मागणी आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यापासून माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील त्यांची कथा ऐकण्यासाठी जात असतात. तर धीरेंद्र शास्त्राr यांची सनातनचे नवे पोस्टर बॉय म्हणून देशविदेशात ओळख निर्माण झाली आहे. त्यांचे कोट्यावधी संख्येत अनुयायी विविध ठिकाणी पसरलेले आहेत. मध्यप्रदेश समवेत राजस्थान, छत्तीसगड, उत्तरप्रदेशमध्ये राजकीय नेते त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करवित असतात. मध्यप्रदेशचे कथावाचक प्रदीप मिश्रा यांचीही निवडणूक काळात विशेष मागणी आहे. प्रदीप मिश्रा हे शिव महापुराणाचा पाठ करतात. सिहोरचे रहिवासी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात नेते मोठ्या संख्येत हजेरी लावत असतात.

छत्तीसगडमध्येही मोठा प्रभाव

छत्तीसगडच्या विलासपूर जिल्ह्यातील बेलतरा येथील सिद्ध बाबा आश्रमात शिवानंद महाराज यांच्या दर्शनासाठी जवळपास सर्वच पक्षाचे उमेदवार पोहोचले आहेत. छत्तीसगडच्या रायगड येथील कोसमनारा येथील सत्यनारायण बाबा यांच्या आश्रमात काँग्रेस, भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. राज्यात गोसेवा आयोगाचे अध्यक्ष हे जेतुसवा मठाचे महंत आहेत. त्यांना यापूर्वी रायपूर दक्षिण मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.