महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरइतरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एलआयसीचा तिमाही नफा 2.5 टक्क्यांनी वधारला

06:56 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाढीसोबत नफाकमाई 13,762 कोटींच्या घरात : कंपनी 6 रुपये प्रति समभाग लाभांश देणार

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी)चा आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीमधील नफा वर्षाच्या आधारे जवळपास 2.5 टक्क्यांनी वधारुन तो 13,762 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा हा 13,427 कोटींवर होता. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 साठी प्रति समभाग 6 रुपयांचा अंतिम लाभांश घोषित केला आहे. कंपनी  नफ्यातील काही हिस्सा त्यांच्या भागधारकांना देतात, ज्याला लाभांश असे म्हणतात.

एलआयसीने 27 मे रोजी चौथ्या तिमाहीतील आणि वार्षिक निकाल जाहीर केले आहेत. एलआयसीने मागील एका वर्षात 71.46 टक्के इतका परतावा दिला आहे. एलआयसीचे समभाग हे मंगळवारी 0.77 टक्क्यांनी वधारुन ते 1,037 वर बंद झाले. मागील वर्षात 71.46 टक्के इतका परतावा दिला होता. एलआयसीचे समभाग हे 17 मे 2022 रोजी बाजारात सुचीबद्ध झाले आहेत.

आर्थिक वर्षात नफ्यात 11.75 टक्के वाढ

पूर्ण आर्थिक वर्ष 2024 साठी एलआयसीचा नफा 11.75 टक्क्यांनी वधारुन तो 40,675.79 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये हाच नफा 36,397.39 कोटींवर होता.

एलआयसी 58.87 टक्क्यांसोबत मार्केटमध्ये मजबूत स्थितीत आहे. पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नामध्ये एलआयसी 58.87 टक्क्यांसह एकूण बाजारात आघाडीवर आहे. कंपनीने आपल्या दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे, की 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षात एलआयसीचा वैयक्तिक व्यवसायात 38.44 आणि समूह व्यवसायात 72.30 टक्के बाजार हिस्सा होता. वैयक्तिक विभागात 2.03 कोटी पॉलिसी विकल्या गेल्या. एलआयसीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये वैयक्तिक सेगमेंटमध्ये 2.03 कोटी पॉलिसीची विक्री केली आहे.

Advertisement
Next Article