For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बँक ऑफ बडोदामधील गुंतवणूक ‘एलआयसी’ने वाढवली

06:21 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
बँक ऑफ बडोदामधील गुंतवणूक ‘एलआयसी’ने वाढवली
Advertisement

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

Advertisement

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) 21 एप्रिल 2025 रोजी बँक ऑफ बडोदा (बीओबी) मधील आपली हिस्सेदारी एकूण 7.053 टक्केपर्यंत वाढवली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत एलआयसीने म्हटले आहे की, ही खरेदी धोरणात्मक गुंतवणूक योजनेंतर्गत दीड वर्षांच्या कालावधीत करण्यात आली.

20 नोव्हेंबर 2023 ते 16 एप्रिल 2025 दरम्यान खुल्या बाजारात 10.45 कोटी समभाग खरेदी करून हा हिस्सा मिळवण्यात आला आहे. आता एलआयसीकडे बँक ऑफ बडोदामध्ये 36,47,58,678 समभाग आहेत. मार्च 2025 पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ‘बँक ऑफ बडोदा’ मध्ये सरकारची हिस्सेदारी 63.97 टक्के होती. एलआयसीकडे बँक ऑफ बडोदामध्ये पूर्वी 5.03 टक्के हिस्सेदारी होती, जी आता 7.053 टक्के इतकी झाली आहे. एलआयसीने 10,45,41,403 समभाग खरेदी केले ज्यामुळे 2.022 टक्के इतकी हिस्सेदारी वाढली.

Advertisement

एलआयसीच्या बँक ऑफ बडोदामधील वाढलेल्या हिस्सेदारीचा परिणाम

एलआयसीच्या या घोषणेनंतर 21 एप्रिल 2025 रोजी बँक ऑफ बडोदाचे समभाग 3.09 टक्क्यांनी वधारले आहेत. तर मागील 1 वर्षात बँकेचा समभाग 5 टक्क्यांनी घसरला आहे. एलआयसीसारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बँक ऑफ बडोदामध्ये वाढवलेला हिस्सा विश्लेषकांकडून सकारात्मक संकेत मानला जात आहे.

Advertisement
Tags :

.