For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलआयसी आरोग्य विमाही क्षेत्रात उतरणार

06:22 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
एलआयसी आरोग्य विमाही क्षेत्रात उतरणार
Advertisement

एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांची माहिती

Advertisement

मुंबई :

देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) आतापर्यंत आयुर्विमा क्षेत्रात काम करत आहे. सध्या जीवन विम्याशी संबंधित पॉलिसी कंपनी विकते. आता ही कंपनी आरोग्य विमा क्षेत्रातही उडी घेणार आहे, अशी माहिती कंपनीनेच दिली आहे.

Advertisement

यासाठी कंपनी अधिग्रहणाचा पर्यायही शोधू शकते. कंपनी आरोग्य विमा उत्पादने आणणार आहे. एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती म्हणाले की, एलआयसी लवकरच आरोग्य विमा आणणार आहे. आरोग्य विमा योजनेवर काम जोरात सुरू आहे. यासाठी एलआयसी इतर आरोग्य विमा कंपन्यांचे अधिग्रहण करू शकणार असल्याचे संकेत आहेत.

आपल्या ग्राहकांसाठी आरोग्य विमा उत्पादनेदेखील आणणार आहे. संमिश्र परवान्यांना परवानगी देण्यासाठी विमा कायद्यात सुधारणा केली जाऊ शकते, अशी आशा आहे. फेब्रुवारीमध्ये, संसदीय समितीने देशात विम्याची पोहोच वाढवण्यासाठी विमाकर्त्यासाठी जीवन, सामान्य किंवा आरोग्य विमा एका घटकाखाली करण्याचा संमिश्र परवाना सादर करण्याची सूचना केली होती.

Advertisement
Tags :

.