For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एलआयसी’कडे दावा न केलेली 881 कोटींची रक्कम

06:54 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘एलआयसी’कडे दावा न केलेली 881 कोटींची रक्कम
Advertisement

पॉलिसी मॅच्युरिटीच्या 3 वर्षांनंतरही दावा केलेला नाही : आर्थिक वर्ष 2023-24 मधील आकडेवारीचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ची आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण 880.93 कोटी रुपयांची दावा न केलेली रक्कम होती. सरकारी माहितीनुसार, एकूण 372,282 पॉलिसीधारकांनी त्यांच्या मॅच्युरिटीचा दावा केलेला नाही. म्हणजेच पॉलिसी मॅच्युरिटीच्या 3 वर्षानंतरही त्यावर कोणी दावा केलेला नाही. तुमच्या कुटुंबातील कोणीतरी एलआयसी पॉलिसी घेतली आहे, जी परिपक्व झाली आहे परंतु पैसे दिलेले नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही त्या पॉलिसी रकमेसाठी दावा करू शकता.

Advertisement

नियमांनुसार, पॉलिसीची मॅच्युरिटी रक्कम, ज्यावर कोणीही दावा केला नाही, दावा न केलेल्या खात्यात टाकली जाते. जर 10 वर्षांपर्यंत ही रक्कम हक्काशिवाय राहिली तर ती ज्येष्ठ नागरिककल्याण निधीमध्ये जमा केली जाते. हा पैसा वृद्धांच्या देखभालीसाठी खर्च केला जातो.

दावा न केलेल्या ठेवीचा दावा कसा करावा

कोणत्याही एलआयसी कार्यालयातून दावा फॉर्म मिळवा आणि अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा. फॉर्म भरल्यानंतर पॉलिसी दस्तऐवज, प्रीमियम पावत्या आणि लागू असल्यास मृत्यू प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे संलग्न करा. एलआयसी कार्यालयात कागदपत्रांसह पूर्ण केलेला फॉर्म सबमिट करा.  तुमच्या दाव्याचे पुनरावलोकन करेल आणि स्वीकारल्यास, ते तुमची हक्क न केलेली रक्कम जारी करेल.

25 कोटींकडे पॉलिसी

1956 पर्यंत भारतात 154 भारतीय विमा कंपन्या, 16 विदेशी कंपन्या आणि 75 भविष्य निर्वाह कंपन्या कार्यरत होत्या. 1 सप्टेंबर 1956 रोजी सरकारने या सर्व 245 कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ सुरू केले,  सध्या 25 कोटींहून अधिक लोकांकडे एलआयसी पॉलिसी आहेत.

दावा न केलेली परिपक्वता निश्चित करण्याची प्रक्रिया

?एलआयसी वेबसाइट : प्ttज्s//त्ग्म्ग्ह्ग्a.ग्ह/प्दस ला भेट द्या

?मुख्यपृष्ठावरील ग्राहक सेवा वर क्लिक करा.

?यावर जा आणि पॉलिसीधारक किंवा दावा न केलेल्या रकमेसाठी पर्याय निवडा.

?पॉलिसी क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड क्रमांक यासारखे आवश्यक तपशील भरा.

?यानंतर तुम्हाला अनक्लेम मॅच्युरिटी असलेल्या पॉलिसीची माहिती मिळेल.

Advertisement
Tags :

.