For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा समभाग आज सुचीबद्ध होणार

06:14 AM Oct 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा समभाग आज सुचीबद्ध होणार
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या क्षेत्रात नाव गाजवणारी एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी सुचीबद्ध होणार आहे. या आयपीओला जवळपास साडेचार लाख जणांनी बोली लावली असून या आयपीओची सर्वाधिक चर्चा होते आहे. आता आयपीओ लिस्टिंगच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष आहे.   देशातला सर्वात मोठा आयपीओ मंगळवारी सकाळी 10 वाजता सुचीबद्ध होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये समभाग 30 ते 35 टक्के प्रिमीयमसह कार्यरत आहे. तेव्हा सुचीबद्ध होताना यात आणखी वाढीचे संकेत आहेत. एलजीचा व्यवसाय हा स्थिर व मजबूत असून लोकांना या कंपनीवर अधिक विश्वास वाटतो आहे. म्हणूनच कंपनीच्या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद नोंदवला गेला.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये दबदबा

Advertisement

टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशिन ते इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये एलजीने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Advertisement
Tags :

.