एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा समभाग दमदार तेजीसोबत सुचीबद्ध
मुंबई :
बहुप्रतिक्षित अशा एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया यांचा समभाग शानदारपणे मंगळवारी बाजारात लिस्ट झाला. इशू किमतीच्या तुलनेमध्ये जवळपास 50 टक्के वाढीसह समभाग शेअर बाजारात लिस्ट झाला. अपेक्षेप्रमाणे समभाग तेजीसोबत शेअरबाजारात उघडलेला दिसला.
सदरच्या आयपीओला जवळपास साडेचार लाख लोकांनी बोली लावली होती. 14 ऑक्टोबरला मंगळवारी सदरचा समभाग एनएसईवर 1710 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. नंतर सत्रात समभाग 1650 रुपयांच्या स्तरावर आला होता. तर दुसरीकडे बीएसईवर हाच समभाग 1715 रुपयांवर जवळपास 50 टक्के वाढीसोबत सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर हा समभाग 1650 रुपयांपर्यंत खाली आला. सदरच्या कंपनीचा सहभाग ग्रे मार्केटमध्येच चांगला प्रतिसाद मिळवत होता. सदरचा समभाग मुख्य बाजारामध्ये 40 ते 50 टक्के वाढीसोबत सूचीबद्ध होईल असे तज्ञांनी यापूर्वीच वर्तवले होते. त्याप्रमाणे सदरचा तज्ञांचा अंदाज तंतोतंत बरोबर ठरला आहे. समभागात गुंतवणूक केलेल्यांना उत्तम परतावा पहिल्याच दिवशी प्राप्त करता आला.