प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात संघाला परवानगी देण्यासाठी पत्र
बेंगळूर : आगामी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला परवानगी द्यावी, या मागणीसाठी राज्यसभा सदस्य नारायण भांडागे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहेत. सदर पत्रात नारायण भंडागे यांनी, आरएसएसने मातृभूमी भारतासाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे आरएसएसला प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी होण्याची संधी देणे हा सर्वोच्च सन्मान असेल, असे म्हटले आहेत. गेल्या एक शतकापासून आरएसएस राष्टीयतेचे पालनपोषण करत आहे. सामाजिक एकता वाढविण्यासह आपल्या महान राष्ट्राच्या भल्यासाठी अथक परिश्र्रम करत आहे. आरएसएस स्वयंसेवकांची नि:स्वार्थ सेवा, राष्ट्रीय विकासासाठी त्यांची वचनबद्धता, आपली संस्कृती आणि वारशाप्रती त्यांचे अटळ समर्पण कौतुकास्पद आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संघ स्वयंसेवकांना आमंत्रित करणे हा केवळ संघटनेसाठी एक सर्वोच्च सन्मान नाही तर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी पडद्यामागे काम करणाऱ्या असंख्य देशभक्त स्वयंसेवकांचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहेत.