खालिदच्या मुक्ततेवरून अमेरिकेच्या खासदारांचे पत्र
भाजपकडून छायाचित्र पोस्ट करत राहुल गांधी लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली दंगलीप्रकरणी तुरुंगात कैद उमर खालिदच्या मुक्ततेवरून अमेरिकेच्या खासदारांनी एक पत्र लिहिले आहे. याप्रकरणी भाजपने शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भारतविरोधी लॉबीला लक्ष्य केले. भाजपने राहुल गांधी आणि अमेरिकेच्या खासदार शाकोव्स्की यांच्यादरम्यान 2024 मध्ये झालेल्या एका बैठकीचा उल्लेख करत हा काँग्रेस नेत्याच्या भारतविरोधी भूमिकेचा पुरावा असल्याचा दावा केला आहे.
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींचे शाकोव्स्की आणि इल्हान उमरसोबतचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे. 2024 मध्ये राहुल गांधी हे अमेरिकेत शाकोव्स्की यांना भेटतात, तसेच सोबत भारतविरोधी इल्हान उमर देखील असते. जानेवारी 2055 मध्ये इल्हान उमर ‘आंतरराष्ट्रीय इस्लामोफोबियाला सामोरे जाण्यासाठीचा अधिनियम’ पुन्हा मांडते, ज्यात स्पष्टपणे भारताचा उल्लेख असतो आणि ‘मुस्लीम समुदायांवर कारवाई’चा आरोप करण्यात येतो. तर नव्या वर्षात त्याच शाकोव्स्की भारत सरकारला उमर खालिदच्या मुक्ततेची मागणी करतात, उमर हा दंगली आणि हिंसेशी निगडित गंभीर प्रकरणांमध्ये युएपीए अंतर्गत आरोपी असल्याचे म्हणत भाजपने राहुल गांधी यांना भारतविरोधी मानसिकतेचा नेता ठरविले आहे.
जेव्हा कधी विदेशात भारतविरोधी कहाणी फैलावली जाते, त्या पाठीमागे राहुल गांधींचे नाव वारंवार समोर येते. जे लोक भारताला कमकुवत करू पाहतात, निवडून आलेल्या सरकारला बदनाद करू इच्च्तात आणि त्याच्या दहशतवादविरोधी कायद्यांना कमकुवत करू इच्छितात, ते अनिवार्य स्वरुपात राहुल गांधींच्या आसपास जमा होतात अशी टीका भाजप नेते प्रदीप भंडारी यांनी केली आहे. राहुल गांधींच्या 2024 चा अमेरिका दौरा, शाकोव्स्की आणि इल्हान उमर यांच्यासोबत भेट तसेच सादर करण्यात आलेल्या विधेयकादरम्यान थेट संबंध असल्याचा दावा भंडारी यांनी केला.
शाकोव्स्की यांची मागणी
शाकोव्स्की यांन भारत सरकारला पत्र लिहित उमर खालिदला जामीन देणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निष्पक्ष सुनावणी सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. शाकोव्स्की यांना भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेच्या खासदार म्हणून ओळखले जाते. त्यांनी संसदेत अनेकदा भारताच्या विरोधात मत व्यक्त केले आहे.