130 वर्षे जुन्या घरात मिळाले पत्र
घराशी निगडित होता मजकूर
जे लोक जुन्या घरांमध्ये राहत असतात, त्यांना अनेक जुन्या गोष्टी गवसत असतात. यातील काही गोष्टी या समोरच्या व्यक्तीला धक्का देणाऱ्या असतात. एका दांपत्याने देखील स्वत:च्या 130 वर्षे जुन्या घराविषयी अशी हैराण करणारी बाब सांगितली आहे, जी कळल्यावर लोकांना धक्काच बसला.
या दांपत्याने हे 130 वर्षे जुने घर खरेदी केले होते, याच घरात त्यांना एक पत्र मिळाले, या पत्रात घराशी निगडित गोष्टी लिहिलेल्या होत्या. कर्टनी आणि मॅट नावाच्या दांपत्याने सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यांनी 130 वर्षे जुने घर खरेदी केल्यावर एक पत्र मिळाले, हे पत्र कॅनडातून पाठविलेले होते. पत्रात घर खरेदीदाराचे नाव होते. पत्रात मॅडिसन परिवाराचा अखेरचा जिवंत सदस्य असल्याचे ते लिहिणाऱ्याने नमूद केले होते. मॅडिसन परिवारच या घराचे मालक होते. तो याच घरात लहानाचा मोठा झाला होता. त्याने पत्रात घरातील गुप्त खोल्यांविषयी आणि अन्य काही गोष्टींविषयी माहिती दिली होती. या पत्राच्या आधारावर शोध घेतला असता दांपत्याला गुप्त खोल्या आढळून आल्या. प्रथम त्यांना एक गुप्त मद्याची कॅबिनेट मिळाली, त्यात अनेक मद्याच्या जुन्या बाटल्या देखील होत्या.
यानंतर बाथरुममध्ये एक गुप्त दरवाजा मिळाला, त्याच्या आत एक खोली होती, जी अत्यंत भीतीदायक होती. यानंतर एक ट्रक रुमही मिळाला. अनेक लोकांनी व्हिडिओत त्यांच्या या घराचे कौतुक केले आहे. दांपत्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओला 21 लाख ह्यूज मिळाल्या आहेत.