For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्र पाठविण्याची सेवा डेन्मार्कमध्ये बंद

07:00 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पत्र पाठविण्याची सेवा डेन्मार्कमध्ये बंद
Advertisement

401 वर्षे जुनी परंपरा संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था/कोपेनहेगन

डेन्मार्कने 401 वर्षे जुन्या परंपरेचा निरोप घेतला आहे. देशाची डाकसेवा पोस्टनॉर्डने देशांतर्गत पत्रांची डिलिव्हरी पूर्णपणे रोखली आहे. आता पत्रं आवश्यक किंवा नफ्याचा व्यवसाय राहिला नसणारा डेन्मार्क हा जगातील पहिला देश ठरला आहे. सद्यकाळात ईमेल, मेसेज आणि डीएमने जुन्या पत्रांची जागा घेतली आहे. डेन्मार्कमध्sय आता प्रसिद्ध लाल डाकबॉक्समध्ये पत्रं टाकण्याची सुविधा मिळणार नाही. या देशाने पूर्णपणे डिजिटल युगात पाऊल ठेवले आहे.

Advertisement

मागील 25 वर्षांमध्ये डेन्मार्क येथे पाठविण्यात येणाऱ्या पत्रांची संख्या 90 टक्के कमी झाली आहे. 2000 साली पोस्टनॉर्डने सुमारे 1.5 अब्ज पत्रे पोहोचविली होती. परंतु मागील वर्षी ही संख्या कमी होत केवळ 11 कोटी राहिली आहे. मागील 20 वर्षांपासून पत्राचारात मोठी घट झाली आहे. आता बहुतांश संवाद इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होतो. डेन्मार्क जगातील सर्वाधिक डिजिटलाइज्ड देशांपैकी एक आहे. येथे लोक शासकीय कामापासून खासगी संभाषण सर्वकाही ऑनलाइन करतात. याचमुळे पत्रं कालबाह्या ठरली आहेत असे उद्गार पोस्टनॉर्डच्या माध्यम प्रमुख इसाबेला बेक जोर्गेनसेन यांनी काढले आहेत.

लाल डाक बॉक्सना निरोप

जून महिन्यापासूनच पोस्टनॉर्डने देशभरात फैलावलेल्या 1500 लाल रंगाच्या डाकबॉक्सना हटविणे सुरु केले होते. प्रथम 1000 बॉक्सना चॅरिटीसाठी विकण्यात आले. प्रत्येक बॉक्सची किंमत सुमारे 472 डॉलर्स होती. हे बॉक्स केवळ 3 तासांमध्ये विकले गेले आहेत.

Advertisement
Tags :

.