बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडूया : आ. निलेश राणे
छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालय 'बांगलादेश हिंदू न्याय यात्रा
10 डिसेंबरच्या न्याय यात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांनी कळस गाठलाय. बांगलादेश मधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित अत्याचार थांबवावेत यासाठी जागतिक मानवाधिकार दिन १० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंधुदुर्गनगरी ओरोस ते जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे निघणाऱ्या 'बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत' हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून बांगलादेशी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडुया. असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे.
बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहेत. केवळ हिंदू म्हणून हे अत्याचार त्यांच्यावर होत आहेत. शेकडो हिंदू मारले जात आहेत. गोळ्या घातल्या जात आहेत. महिलांवरही अत्याचार सुरु आहेत, मुली पळविल्या जात आहेत. उघड्या डोळ्यांनी हे आपण कसे पाहायचे ? बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराने कळस गाठला आहे. हे अत्याचार थांबविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊयात. जागतिक मानवाधिकार दिन दहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे निघणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून बांगलादेशी हिंदू बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडूया. अत्याचाराचा निषेध नोंदवूया. हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन हे अत्याचार थांबले पाहिजेत याबाबत भूमिका मांडूयात. हिंदू बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होऊया. असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे.