विशाळगडावर उरूस कसा होतो बघू.....
मंत्री नितेश राणे यांचा इशारा
'ड्रोन'च्या माध्यमातून किनारपट्टीवर बारकाईने लक्ष ठेवून जिहाद मुक्त करू
संजय राऊत याला बाप बदलण्याची सवय
एक तर तू राहशील किंवा मी राहीन असा म्हणणारा पेंग्विन ठाकरे फडणवीसांच्या पायाशी
आदित्य ठाकरे नाईट लाईफ यांचा हृदयसम्राट : मंत्री नितेश राणे
सांगली
विशाळगडावर १२ तारखेला ऊरूस होणार आहे, अशी माहिती आहे. विशाल गडावर यापूर्वी काय काय घडले, हे सर्वांना माहित आहे. १२ तारखेला त्या ठिकाणी कोणीही कायदा व सुव्यवस्था खराब करता कामा नये. हिंदू समाजाने संयमाने घेतले आहे. मुस्लिम समाज देखील संयमान घ्यावं. उगाच हिंदू समाजाला डिवसण्याचा आणि भडकवण्याचा प्रकार कोणीही करू नये. सरकार म्हणून आम्ही तिकडे लक्ष ठेवून आहोत, असे वक्तव्य मस्त्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
हिंदू एकता आंदोलन व हिंदू गर्जना सभेतर्फे राज्यातील पहिल्या हिंदू व्यवसायिक संमेलनाचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे हिंदू गर्जना सभा झाली. यावेळी आमदार सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीत केळकर आदी उपस्थित होते. या सभेमध्ये मंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे होते. यावेळी ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे किनारपट्टी ड्रोन विषयी बोलताना म्हणाले, पहिलं सरकार असा आहे की जे किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची सुरक्षा कवच कालपासून सुरू केलेली आहे. या ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवर होणाऱ्या अवैध धंदे, तसेच अन्य राज्यातून येणारे आमच्या मच्छीमाऱ्यांच्या हक्काचं व्यवसाय हिरावून घेणार असतील. कोणीही आमच्या किनारपट्टीवर येऊन अवैद्य बांधकाम, अवैध धंदे करत असतील यांच्यावर फार बारकाईने ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. आमच्याकडे मिळणाऱ्या माहितीनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत त्यांच्यावर कारवाई करून किनारपट्टी जिहाद मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
याप्रसंगी मंत्री राणे संजय राऊत यांच्याविषयी बोलताना म्हणाले, संजय राऊत यांना नेहमी बाप बदलण्याची सवय आहे. म्हणून मी संजय राऊत यांचा संजय राजाराम राऊत असं नाव का घेतो ? तर त्यांचा बाप राजाराम राऊत आहे हे त्यांना कळावं म्हणून. आज सकाळचं वक्तव्य ऐकल्यानंतर असं वाटतं की संजय राऊत यांच्या आयुष्यात नवीन बाप येत आहे.
पुढे मंत्री नितेश राणे म्हणाले, एक एकतर तू राहशील किंवा मी राहील असं म्हणणाऱ्यांना आता फडणवीस यांच्या पायाखाली राहण्याची वेळ आली आहे. तो पेंग्विन ठाकरे रोज त्यांच्याकडे जात आहे. हे आमच्या साहेबांचं मोठेपण आहे आम्हाला राज्य चालवायचा आहे. आदित्य ठाकरे एका भागाचा आमदार आहे. त्याचं ऐकून घेऊन त्याला मदत करणं असं समाजसेवा आमचे साहेब करत असतात. आदित्य ठाकरे नाईट लाईफ गॅंगचा हृदयसम्राट आहे. त्याच्या बार मधून अशाच पद्धतीच्या गोष्टी होणार नाही. हे तुम्हाला फक्त पाच टक्के कळले आहे. 95% आदित्य ठाकरेचे कारनामे कळतील. तेव्हा चौका चौकात त्याला माता-भगिनी चप्पलने मारतील.