For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संसदेमध्ये बेळगावच्या विकासासाठी आवाज उठवू!

10:13 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
संसदेमध्ये बेळगावच्या विकासासाठी आवाज उठवू
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : तालुक्याच्या विविध भागात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार

Advertisement

बेळगाव : मतदार संघातील गोरगरीब जनतेच्या सुख-दु:खाची मृणाल हेब्बाळकर यांना चांगली जाणीव आहे. मतदारसंघाच्या विकासाचे त्यांचे स्वप्न आहे. संसदेमध्ये बेळगावचा आवाज उठवून विकास साधतील, असे महिला आणि बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रचारादरम्यान सांगितले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यातर्फे शनिवारी गेजपती, बडस के. एच. कुकडोळी, भेंडिगेरी, नेगिनहाळ आदी गावांमध्ये प्रचार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

मुलाला आशीर्वाद देण्याचे आवाहन

Advertisement

आपल्याकडे अधिकार असो अथवा नसो जनतेची कामे करत राहू, हेच संस्कार आपल्या मुलालाही दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मृणाल हेब्बाळकर व चिकोडी लोकसभा मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. या दोन्ही तरुण उमेदवारांना मतदारांनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस पक्ष वचनबद्ध

काँग्रेस पक्ष म्हणजे वचनबद्ध, गोगरिबांचा पक्ष, गॅरंटी योजना समर्पकपणे राबवून वचन पाळण्यात आले आहे. या योजनांच्या माध्यमातून गोगरीब नागरिकांना अधिक मदत झाली आहे. यापुढेही गरिबांच्या कल्याणासाठी सरकार कार्यतत्पर राहणार आहे. दहा महिन्यांमध्ये काँग्रेस सरकारकडून अनेक विकासाभिमुख कामे करण्यात आली आहेत. या भागातील जनतेने आपल्यावर कृपाशीर्वाद दाखविला आहे. त्याप्रमाणेच काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर याच्यावरही कृपाशीर्वाद दाखवावा, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. यावेळी उमेदवार मृणाल हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, स्थानिक काँग्रेस नेते, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुडलसंगमच्या स्वामींचा घेतला आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरु बसवजय मृत्यूंजय स्वामींची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी स्वामीजींनी पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण मिळावे यासाठी प्रदीर्घ लढा देण्यात आला होता. या लढ्यामध्ये हेब्बाळकर कुटुंबीयांनी भाग घेतला होता, याचे स्मरण करून कौतुक केले.

Advertisement
Tags :

.