For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बैलहोंगलमधून सर्वाधिक मतदान मिळवून देऊ

11:19 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
बैलहोंगलमधून सर्वाधिक मतदान मिळवून देऊ
Advertisement

आमदार महांतेश कौजलगी : बैलहोंगल येथे मृणाल हेब्बाळकरांचा प्रचार

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना मतदान केले तर आपल्याला मतदान केल्यासारखे आहे. बैलहोंगल विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान मिळवून देवू, असे आमदार महांतेश कौजलगी यांनी सांगितले. बैलहोंगल विधानसभा मतदारसंघातील यकुंडी, बडली आणि बैलहोंगल शहरांमध्ये प्रचार करून आयोजित प्रचार मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा विजय निश्चित आहे. गेल्या दहा महिन्यांपासून राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून गोरगरिबांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवित आहे. महिला सबलीकरणाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. पाच गॅरंटी योजना राबवून दुष्काळ परिस्थितीत नागरिकांना मोठा आधार दिला आहे. हे लक्षात घेऊन मतदारांनी काँग्रेस पक्षाला मतदान करावे, असे आवाहन आमदार कौजलगी यांनी केले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, मृणाल हेब्बाळकर यांना सर्वाधिक मतदान करून दिल्लीला पाठवा तर भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना पराभूत करून घरी पाठवा, असे आवाहन मतदारांना केले. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला तर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करून मतदारसंघाचा विकास केला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष शंकरगौडा पाटील, युवा काँग्रेस अध्यक्ष कार्तिक पाटील, महांतेश मत्तीकोप्प, ग्राम पंचायत अध्यक्ष चिदंबर आडीन, अनिल मेकलमर्डी, कृष्णा मास्तर, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.