कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लठ्ठपणाला हरवुया...मोदींचे आवाहन

06:22 AM Mar 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये देशात वाढणाऱ्या लठ्ठपणाबाबत चिंता व्यक्त केली होती. भारतीयांमध्ये लठ्ठपणा होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून हा लठ्ठपणा दूर करण्यासाठी त्याबाबत जागृती करायची गरज असल्याचे ते म्हणाले. मन की बात मध्ये त्यांनी लठ्ठपणा हा योग्य नसून त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. आपल्या खाद्यातील तेलाचे प्रमाण 10 टक्केने कमी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

Advertisement

जागतिक स्तरावर पाहता लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींच्या संख्येमध्ये भारत तिसरा मोठा देश आहे. लॅनसेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. देशातील लोकसंख्येपैकी 70 टक्के जणांना लठ्ठपणाशी सामना करावा लागतो आहे. ही सर्वात गंभीर बाब आहे. जागतिक स्तरावर पाहता भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश असून चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. संख्येचा विचार करता भारतामध्ये जवळपास 8 कोटी जणांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये 1 कोटी लोक हे 5 ते 19 वर्षीच्या दरम्यान आहेत. 3 कोटी जणांना अधिक वजन किंवा लठ्ठपणा याला सामोरे जावे लागते आहे. यातून पुन्हा 62 दशलक्षजण डायबेटीसशी तोंड देत आहेत, असेही म्हटले आहे.

Advertisement

मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये लठ्ठपणा या गंभीर समस्येबाबत आवाज उठविला. लठ्ठपणाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या खाण्यात तेलाची 10 टक्क्यांची कपात करण्याचे आवाहनही त्यांनी संपूर्ण देशवासीयांना केले. 4 मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा दिवस साजरा केला जातो. यंदा हा दिवस साजरा करताना वरील बाब लक्षात ठेवावी लागणार आहे. 2019 मध्ये जवळपास 20 हजार जणांनी लठ्ठपणाच्या कारणास्तव शस्त्रक्रिया करुन घेतली होती. एकदशकामागे पाहता हे प्रमाण केवळ 800 शस्त्रक्रिया इतके होते. यावरुन भारतीय हे लठ्ठपणाच्या आहारी मोठ्या प्रमाणात जात असल्याचे सिद्ध होत आहे. याबाबतीमध्ये भारतीय पूर्णत: दुर्लक्ष करत असल्याची बाब स्पष्ट होते आहे. नेमका हाच मुद्दा पंतप्रधानांनी उचलून धरलेला आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान अधिक गंभीर झाले असून त्यांनी अलीकडेच याविरुद्ध लढण्यासाठी 10 जणांची प्रचार समितीत निवड केलेली आहे. या दहा जणांमध्ये जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री उमरअब्दुल्ला, व्यावसायिक आनंद महिंद्रा आणि अभिनेता मोहन लाल यासह इतरांचा समावेश केलेला आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रामधील महनिय व्यक्तींचा समावेश लठ्ठपणाविरुद्धच्या प्रचारासाठी केला गेला आहे. क्रीडा स्पर्धेत यश मिळविणारी मनु भाकर तसेच मिराबाई चानु, इन्फोसीसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी, अभिनेता आर. माधवन, गायिका श्रेया घोषाल, खासदार सुधा मूर्ती यांचाही यामध्ये समावेश केला आहे. खाद्य पदार्थांमध्ये कमीतकमी तेल वापरण्याचा संदेश प्रचारामार्फत दिला जाणार आहे. खाण्याच्या तेलाचे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत घटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लठ्ठपणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामध्ये हृदयविकारही येतो. त्याच प्रमाणे टाईप दोनचा डायबेटीस, दम्या सारखे आजार बळावतात. या वरीलपैकी काहींनी पुन्हा आपल्याकडून 10 जणांची नव्याने निवड करीत लठ्ठपणाविरुद्ध लढण्याच्या मोहीमेला बळ दिले आहे. उमरअब्दुल्ला यांनी किरण मुजुमदार शॉ, दिपीका पादुकोन, सज्जन जिंदाल, सानिया मिर्झा, इरफान पठाण, सुप्रिया सुळे यांची निवड केली आहे. एकंदर लठ्ठपणाविरुद्ध लढण्याच्या मोहिमेचीच मन की बात मधून पंतप्रधानांनी सुरुवात केली आहे. लठ्ठपणा ही बाब गंभीर आहे पण त्याबाबत स्थानिक स्तरावर व सार्वजनिक ठिकाणी जास्तीत जास्त प्रचार करायला हवा. लठ्ठपणाबाबत शालेय स्तरावरच मुलांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यातून होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबाबतचे मार्गदर्शनही होणे काळाची गरज आहे.

दीपक कश्यप

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article