शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांचे प्रतिपादन ; वजराट येथे शेतकरी बैठक
वेंगुर्ले (वार्ताहर)-
गेली सहा ते सात वर्षे शेतकऱ्यांसाठी आपण निस्वार्थीपणे काम करत आहे त्याचप्रमाणे शासन स्तरावर आजही संघटना व शेतकरी लढा देत आहेत शासनाकडून आपल्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे या सभेत आपण सर्वांनी त्यासाठी दिलेल्या पाठिंबामुळे आपण खंबीरपणे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ पाहून असे निर्णय निश्चित घेऊ. शासनाकडील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया असे प्रतिपादन शिवाजी महाराज छत्रपती जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी केले.श्री शिवाजी महाराज छत्रपती जिल्हा शेतकरी संघटना सभा वजराट येथील सातेरी मंदिरात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकरिता व पुढील काही ठोस निर्णय घेण्यासाठी संघटना सदस्य व शेतकरी यांची बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत वजराट येथील शेतकरी माजी सरपंच तथा देवस्थानचे मानकरी सूर्यकांत परब, कार्यकारणी सदस्य प्रकाश वारंग, अमोल सावंत, शेखर आरोलकर, वसंत परब, विशाखा बांदीवडेकर यांनी आपले विचार मांडले.यावेळी उपस्थितांत संघटनेचे उपाध्यक्ष जगन्नाथ गावकर, सचिव महेश चव्हाण, खजिनदार अमोल सावंत, प्रकाश वारंग, सदस्य संदीप देसाई, शेखर आरोलकर, वजराटचे माजी सरपंच सूर्यकांत परब, विशाखा बांदीवडेकर, वसंत परब, मनोहर परब, सुभाष भगत, प्रमोद गोळम, लाडू परब, गणपती चंद्रकांत सावंत, उदय सोनसुरकर, प्रकाश कांदे, घनश्याम मांजरेकर आदींचा समावेश होता.