For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘चित्ती असू द्यावे असमाधान’

06:30 AM Jun 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘चित्ती असू द्यावे असमाधान’
Advertisement

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे तब्बल 40 वर्षांचे राजकीय साथीदार, त्यांचे कट्टर समर्थक डॉ. एच. सी. महादेवप्पा यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी प्रचंड धडपड करूनही सिद्धरामय्या यांना यश आले नाही. उर्वरित 20 मंत्रिपदांवर 2028 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरुण, होतकरू व कर्तबगार आमदारांना संधी देण्याचे हायकमांडने ठरविले आहे. त्यामुळे सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील अनेकांना मंत्रिपदापासून वंचित रहावे लागणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमधील खदखद आणखी वाढणार आहे.

Advertisement

डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केवळ दोन दिवसातच नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या मनातील असंतोषाचा भडका उडाला. मुख्यमंत्र्यांसह एकूण 14 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आणखी 20 मंत्रिपदांसाठी दोन डझनहून अधिक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपल्यालाच मंत्रिपद मिळावे, यासाठी काही जणांची धडपड सुरू आहे. तर मंत्रिपद मिळाले तरी इच्छित खाते मिळाले नाही म्हणून काही नेत्यांच्या मनात खदखद आहे. पाटबंधारेमंत्री रामलिंगा रे•ाr यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हायकमांड व मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर त्यांनी तूर्त राजीनामा मागे घेतला तरी त्यांच्या मनातील खदखद मात्र कमी झाली नाही.

रामलिंगा रे•ाr हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना बेंगळूर विकास मंत्रिपद हवे होते. सिद्धरामय्या सरकारमध्ये हे मंत्रिपद डी. के. शिवकुमार यांच्याकडे होते. त्याचवेळी डी. के. शिवकुमार व डी. के. सुरेश या बंधूंनी पुढच्या वेळी बेंगळूर विकास मंत्रिपद तुम्हालाच, असे आश्वासन त्यांना दिले होते. दिलेल्या शब्दाची जाणीव करून देत ‘दिलात तर बेंगळूर विकास द्या, नाहीतर आपल्याला मंत्रिपदच नको’, अशी ताठर भूमिका घेत रामलिंगा रे•ाr यांनी राजीनामा जाहीर केला होता.  3 जून रोजी डी. के. शिवकुमार यांच्यासह 14 मंत्र्यांनी शपथ घेतली. लगेच रामलिंगा रे•ाr यांनी मंत्रिपदाचा राजीनामा जाहीर केला. खातेवाटपानंतर काँग्रेसमध्ये असंतोषाचा भडका उडाला.

Advertisement

आणखी एक ज्येष्ठ नेते के. एच. मुनियप्पा यांना समाजकल्याण खाते हवे होते. यापूर्वी असलेलेच अन्न व नागरीपुरवठा खाते त्यांना देण्यात आले आहे. या मंत्रिपदावर ते खुश नाहीत. हे प्रकरण राजीनाम्याचे पर्व सुरू असतानाच बेंगळूर दौऱ्यावर आलेले राहुल गांधी यांच्यापर्यंतही पोहोचले आहे. रामलिंगा रे•ाr यांच्या पाठोपाठ के. एच. मुनियप्पा यांनीही राजीनाम्याची तयारी ठेवली होती. हायकमांडने त्यांचे समाधान केले आहे. आता ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या मनातील असंतोषही वाढतो आहे. मंत्रिपदासाठी हायकमांडकडे दबावतंत्र वापरले जात आहे.  ज्या बेंगळूर विकास मंत्रिपदासाठी रामलिंगा रे•ाr यांनी राजीनामा जाहीर केला ते मंत्रिपद ज्यांना मिळाले आहे ते कृष्ण भैरेगौडाही त्या पदावर समाधानी नाहीत. बीडीए व बीएमआरडीए या दोन महत्त्वाच्या संस्था वगळून त्यांच्याकडे बेंगळूर विकास मंत्रिपद सोपविण्यात आले आहे.

डी. के. शिवकुमार यांच्याकडे बेंगळूरचे पालकत्व होते. त्यावेळी बीडीए व बीएमआरडीए या दोन्ही संस्था त्यांच्याकडेच होत्या. या दोन संस्था वगळून मंत्रिपद द्यायचे असेल तर आपल्याला मंत्रिपदच नको, अशी भूमिका कृष्ण भैरेगौडा यांनी हायकमांडकडे मांडली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डी. के. शिवकुमार हे दोन-तीन दिवस दिल्लीत होते. आपल्या या दिल्ली दौऱ्यात त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आदी नेत्यांची भेट घेतली आहे. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद मिळवून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यावेळी मंत्रिपदासाठी आपली वर्णी लागावी, यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे तब्बल 40 वर्षांचे राजकीय साथीदार, त्यांचे कट्टर समर्थक डॉ. एच. सी. महादेवप्पा यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी प्रचंड धडपड करूनही सिद्धरामय्या यांना यश आले नाही. उर्वरित 20 मंत्रिपदांवर 2028 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरुण, होतकरू व कर्तबगार आमदारांना संधी देण्याचे हायकमांडने ठरविले आहे. त्यामुळे सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील अनेकांना मंत्रिपदापासून वंचित रहावे लागणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमधील खदखद आणखी वाढणार आहे. आणखी एक प्रभावी नेते बी. झेड. जमीरअहमद यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला. दावणगेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.

मंत्रिमंडळ विस्तारावेळी तरी जमीरअहमद यांना मंत्रिपद मिळणार याची शाश्वती नाही. त्यामुळेच की काय? बेंगळूरसह संपूर्ण राज्यात त्यांना मंत्रिपद द्यावे, त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. सुरुवातीला चार उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करावीत, या मागणीने जोर धरला होता. शेवटी डॉ. जी. परमेश्वर यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तेही समाधानी नाहीत. तब्बल तीनवेळा मुख्यमंत्रिपद आपल्याला हुकले. 2013 मध्ये आपण प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावर असताना पक्ष सत्तेवर आला. मात्र, आपण पराभूत झालो. त्यामुळे त्यावेळी मुख्यमंत्रिपद हुकले. निवडून आलो असतो तर कदाचित सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले नसते. 2018 मध्ये काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. निजदबरोबरच्या मैत्रीमुळे एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. आताही आपल्याला संधी होती. मात्र, मुख्यमंत्रिपद तिसऱ्यांदा हुकले, असे सांगत डॉ. जी. परमेश्वर यांनी आपल्या मनातील नाराजी बोलून दाखविली आहे. यावरून ज्यांना मंत्रिपद मिळाले आहे त्यांच्याबरोबरच कोणीही समाधानी नाहीत, हे स्पष्ट होते. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही खदखद आणखी वाढणार आहे.

-रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.