For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मला बी विमानात बसू द्या की रं...

11:23 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मला बी विमानात बसू द्या की रं
Advertisement

सामान्य खेडुताचे बेळगाव ते तिरुपती विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण 

Advertisement

बेळगाव : 

‘काठी न् घोंगड घेऊ द्या की रं,

Advertisement

मला बी विमानात बसू द्या की रं...

विमान हे बालपणापासून सर्वांचे आकर्षणच असते. आपणही विमानात बसावे असे प्रत्येकाला वाटते. या खेडूताने सुद्धा हे स्वप्न पाहिले असेल. आता ते प्रत्यक्षात साकार होण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पोटासाठी रानात वणवण करणारे असे अनेक खेडूत चपलांशिवाय भटकंती करीत असतात. या खेडूताच्या हातात विमानाचे तिकीट आहे, परंतु पायात मात्र पादत्राणे नाहीत. ही विसंगती नाही तर, स्वप्नांची परिपूर्ती आहे. बेळगावच्या सांबरा विमानतळावर आपल्या हातात विमानाचे तिकीट घेऊन हा प्रवासी उभा आहे. दोन गोष्टींसाठी त्यांनी इतरांसह प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. एक म्हणजे त्यांची उंची आणि दुसरे म्हणजे न घातलेले पादत्राणे.

पंचतारांकित हॉटेलमध्ये श्रीमंतच जायचे, विमान प्रवाससुद्धा श्रीमंतांनीच करायचा, या समजाला या प्रवाशाने छेद दिला. परंतु ‘मी माझ्यासाठी माझ्या आनंदासाठी’ हेच तर अधोरेखीत केले नसेल का? सहप्रवाशाने टिपलेला हा क्षण समाज माध्यमांवर बराच व्हायरल झाला असून सर्वसामान्यही स्वप्ने पाहू शकतात, त्यांची स्वप्नेही पूर्ण होतात, हे यातून स्पष्ट होत आहे. बेळगावमधील संजीव जोशी यांनी बेळगाव विमानतळावर हा सुरेख फोटो टिपला आहे. हा शेतकरी रायबाग तालुक्यातील असून त्याने बेळगाव ते तिरुपती असा विमान प्रवास केला.

Advertisement
Tags :

.