महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो

10:35 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात जागृती कार्यक्रम

Advertisement

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कुष्ठरोगाविषयी जागृती कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. हिंडलगा येथील दि लेप्रसी मिशन कुष्ठरोग इस्पितळ, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकाऱ्यांचे कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेलर बसवराज बजंत्री होते. या कार्यक्रमात डॉ. सुरेश वर्गिस, हर्षा गुडीसलमनी, भरत एच. बी. आदी उपस्थित होते. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना हर्षा म्हणाले, गेल्या शंभर वर्षांपासून कुष्ठरोग निवारणासाठी हिंडलगा येथील इस्पितळ कार्यरत आहे. कुष्ठरोगाविषयी कोणीच घाबरण्याचे कारण नाही. वेळेत योग्य उपचार झाला तर हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तुम्हीही या रोगाविषयी आपल्या कुटुंबात, समाजात जागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. भरत एच. बी. म्हणाले, कुष्ठरोग बरा होण्यासाठी सरकारकडून मोफत औषधे दिली जातात. वैयक्तिक स्वच्छता व परिसराच्या साफसफाईवर प्रत्येकाने भर द्यावा, असे सांगत कुष्ठरोगाची लक्षणे व त्यावरील उपचारांची माहिती दिली. जेलर एफ. टी. दंडयनवर, संगमेश मेळेद आदी उपस्थित होते. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article