For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Umbraj | तासवडे एमआयडीसीत बिबट्यांचा थरार! रात्रपाळीच्या कामगारांची उडाली घाबरगुंडी

03:10 PM Mar 22, 2026 IST | NEETA POTDAR
umbraj   तासवडे एमआयडीसीत बिबट्यांचा थरार  रात्रपाळीच्या कामगारांची उडाली घाबरगुंडी
Advertisement

         कराड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीत बिबट्यांचा मुक्त संचार

Advertisement

उंब्रज -कराड तालुक्यातील तासबडे येथील औद्योगिक वसाहतीत शनिवारी पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तासबडे एमआयडीसीमधील डी- १० ब्लॉकमधील खासगी कंपनीच्या परिसरात भक्ष्याच्या शोधात तब्बल दोन बिबटे घुसल्याचे उघडकीस आले. त्यांच्या हालचाली कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या घटनेमुळे औद्योगिक वसाहत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रपाळीवर असलेल्या कामगारांना कंपनीच्या गेटमधून दोन बिबटे आत शिरताना दिसले. यामुळे कामगारांची घाबरगुंडी उडाली. काही काळ हे बिबटे कंपनीच्या आवारात मुक्तपणे बाबरत होते. मात्र काही वेळातच ते निघून गेले.या घटनेनंतर घाबरलेल्या कामगारांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. पहाटेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून कामगारांना बिबट्यांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले.

Advertisement

दरम्यान, तासवडे, तळबीड आणि वराडे परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीलगतच्या डोंगराळ भागात बिबट्यांचे वास्तव्य आहे. अनेकदा ते नागरी व औद्योगिकभागात शिरकाव करत आहेत. यापूर्वीही या परिसरात बिबट्यांचे दर्शन झाले असून सीसीटीव्हीतही अनेक वेळा बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. या परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

वनविभागाने बराडे हद्दीत चार वर्षांपूर्वी पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या उपाययोजना तात्पुरत्या ठरल्याचे दिसून येत आहे. वाढत्या बिबट्यांच्या संख्येमुळे नागरिक आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.