सिंधुदुर्गात बिबट्यांनी गाठली शंभरी !
गजबजलेल्या शहरातही बिबट्यांचे वास्तव्य ; नागरिक भीतीच्या छायेत
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिबट्यांनी आपली शंभरी गाठली आहे . कारण , जिल्ह्यात बिबट्यांची संख्या 100 पार झाली आहे. ग्रामीण भागात असलेला बिबट्या आता शहरात वास्तव्य करू लागला आहे. सावंतवाडी खासकिलवाडा , तिलारी कॉलनी येथील रहिवासी आबा गावडे यांच्या घराजवळ रस्त्यावर भरवस्तीत रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले आहे. सावंतवाडीहुन चराठा येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दत्ता शिंदे मोटर सायकलने जात असताना त्यांच्या मोटरसायकल समोर रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले. ग्रामीण भागात पाहायला मिळणारे बिबट्या आता गजबजलेल्या शहरातही आपले वास्तव्य करू लागले आहेत. तिलारी कॉलनी भागात बिबट्याचा वावर सुरू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सिंधुदुर्ग जिल्हा वन्य प्राण्यांसाठी झोन ठरत आहे.