For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News : मसूरच्या पिरजादे बंगला वस्तीमध्ये बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये घबराट

05:18 PM Dec 26, 2025 IST | NEETA POTDAR
karad news   मसूरच्या पिरजादे बंगला वस्तीमध्ये बिबट्याचा वावर  नागरिकांमध्ये घबराट
Advertisement

                            मसूर परिसरात गेल्या पंधरवड्यात बिबट्याचा वारंवार वावर

Advertisement

मसूर : मसूर (ता. कराड) येथील पिरजादे बंगला वस्तीमध्ये बुधवारी रात्री दहा वाजता नागरिकांना बिबट्याचा वावर दिसला. त्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे, सदर बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

मसूरच्या उत्तर बाजूकडे पिरजादे बंगला वस्ती आहे. तिथे कमी लोकवस्ती असून शेती आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तेथील नागरिकास बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी नागरिकांना घराच्या बाहेर पहून नये, अशी सूचना केली. दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते प्रा. कादर पिरजादे यांनी वनविभागाच्या - शीतल पाटील यांना बिबट्याचा जिथे वावर झाला, तेथे त्याच्या पायाच्या पंजाचे ठसे दाखवले.

Advertisement

प्राथमिकदृष्ट्या सदर ठसे बिबट्याचे असल्याची खात्री झाली. यावेळी पाटील यांनी तेथील शेतकल्यांना व नागरिकांना रात्री अपरात्री विशेष काळजी घेण्याचे सांगितले. रात्री घराबाहेर पडू नये, स्वतःचे संरक्षण कराचा सूचना केल्या.

यावेळी कादर पिरजादे यांनी या पंधरवड्यात बिबट्याचे ठिकठिकाणी वावर असल्याचे सांगितले बिबट्याच्या वावरामुळे जनमानसात भीतीचे बातावरणात असून त्याचा बंदोबस्त करावा याप्रकरणी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. शीतल पाटील यांनी ग्रामपंचायत बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा प्रस्ताव वन विभागाकडे दिल्यास त्यावर वनविभाग उपाययोजना करू शकते, असे सांगितले यावेळी धनंजय महाजन संजय जाधव व नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.