For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : अंबपमध्ये शेतात बिबट्याचे दर्शन; गावात भीतीचे वातावरण

12:10 PM Nov 21, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   अंबपमध्ये शेतात बिबट्याचे दर्शन  गावात भीतीचे वातावरण
Advertisement

                       अंबप येथे बिबट्यामुळे सावधगिरीचा इशारा

Advertisement

by किशोर जासूद

अंबप : अंबप ता हातकणंगले येथे अंबपवाडी रस्त्यालगत असणाऱ्या बावडेकरांच्या शेतात आज गुरुवारी दुपारी मका पिकास पाणी पाजत असताना शेतमजुराला बिबट्या निदर्शनास आला. बिबट्याला पाहतात शेतकऱ्यांनी धूम ठोकली. जवळच कुत्र्याची शिकार करून त्याचे अवशेष पडल्याचे निदर्शनास आले. असून गावामध्ये भीतीचे वातावरण आहे

Advertisement

या घटनेची माहिती मिळताच अंबप ग्रामपंचायतीच्या वतीने वनविभागाला कळविण्यात आले असता वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आले मात्र बिबट्याचा मागमुस लागला नाही ड्रोनच्या माध्यमातून जवळपास दोन तास सर्व भागातील पाहणी केली पण निदर्शनास काही आले नाही यावेळी वनविभाग अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले

वन विभाग कोल्हापूरच्या वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार,अमोल चव्हाण,मतीन बांगी, विनायक माळी यांनी अंबप येथे येऊन शोध मोहीम राबवली यावेळी विकासराव माने, उपसरपंच अशीप मुल्ला,स्वप्नील जाधव, प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

Advertisement
Tags :

.