For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोंडये येथे काजूबागेत बिबट्याचे दर्शन

03:49 PM Dec 05, 2023 IST | अनुजा कुडतरकर
कोंडये येथे काजूबागेत बिबट्याचे दर्शन
Advertisement

बिबट्या अगदी शांत स्थितीत: काहींनी फोटो, व्हिडिओही घेतले

Advertisement

कणकवली : वार्ताहर

कोंडये येथील फांदीचा माळ येथे काजू बागेत सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. विशेष म्हणजे बिबट्या अगदी शांत स्थितीत होता. बिबट्या दिसल्याचे कळताच ग्रामस्थांनीही तेथे धाव घेतली. ग्रामस्थ अगदी काही फुटांवर असून देखील बिबट्या शांत होता. कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांना हा बिबट्या सर्वप्रथम दृष्टीस पडला. एरव्ही बिबट्या दिसला की सर्वांची पळापळ होते. पण हा बिबट्या अगदी शांतपणे पाऊले टाकत होता. त्यामुळे काही ग्रामस्थांनी धाडस करून बिबट्याचे फोटो, व्हिडिओ देखील घेतले. जवळपास पंधरा मिनिटे बिबट्या तेथे होता. त्यानंतर तो जंगलच्या दिशेने निघून गेला. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमित कटके आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. बिबट्या इतका शांत स्थितीत का आहे, याचे उत्तरही शोधण्यात येणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोंडये ग्रामपंचायतीतर्फे वनविभागाकडे करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.