For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sawantwadi : सावंतवाडीत बिबट्याचे सीसीटीव्हीत दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण

04:16 PM Feb 08, 2026 IST | NEETA POTDAR
sawantwadi   सावंतवाडीत बिबट्याचे सीसीटीव्हीत दर्शन  परिसरात भीतीचे वातावरण
Advertisement

                                बेळगाव मुख्य मार्गाजवळील बिबट्याचे दर्शन

Advertisement

सावंतवाडी  : बेळगाव मुख्यमार्गालगत कारिवडे पेडवे माळकरवाडीतील भर वस्तीत बिबट्याच्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

येथील अनिल माळकर यांच्या घराचे सध्या बांधकाम सुरू असून त्याच ठिकाणी शनिवारी मध्ये रात्री १२ च्या सुमारास हा बिबट्या सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे. या बिबट्याने चोर पावलाने घरात प्रवेश करत घराची रेकी केली मात्र त्याच्या हाती काही सापडले नाही.

Advertisement

यापूर्वीही या बिबट्याचे काही ग्रामस्थांना दर्शन झाले होते. बिबट्याच्या या मुक्त संचाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन खात्याने याची तात्काळ दखल घेत या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.