कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्हावेलीत बिबट्याचा मुक्त संचार ; ग्रामस्थ भयभीत

04:04 PM Jul 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

बंदोबस्त करा ; उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची वनविभागाकडे मागणी

Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

न्हावेली गावात बिबट्या ,तसेच गव्यांचा भरवस्तीत मुक्त वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने या वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शिंदे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी उपवनसंरक्षक श्री शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. न्हावेली पंचक्रोशी मध्ये वन्य प्राण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे, अशातच सोमवारी रात्री न्हावेली ग्रामपंचायत परिसरामध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर तेथील ग्रामस्थांनी आपल्या अंगणात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटे तसेच गवे थेट भरवस्तीत वावरू लागल्याने ग्रामस्थांना रात्री अपरात्री रस्त्यावर फिरणे ही भीतीचे बनले आहे, अलीकडेच मळेवाड कोंडुरा येथे बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याचा प्रकार ताजा असतानाच न्हावेली गावात थेट अंगणात बिबट्याचा वावर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. याआधी गावातील काही शेतकऱ्यांच्या जनावरांवरही बिबट्याने हल्ला केल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. वन्य प्राण्यांकडून एखाद्या माणसाचा जीव गेल्यास वनविभाग तो भरून देणार का असा सवाल श्री पार्सेकर यांनी निवेदनातून केला आहे यावेळी विठ्ठल परब आणि अनिकेत धवण उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article