For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : वडणगे परिसरात बिबट्याचा वावर ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

05:33 PM Feb 01, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   वडणगे परिसरात बिबट्याचा वावर   ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Advertisement

                          पन्हाळ्यानंतर करवीर तालुक्यातही बिबट्याची दहशत

Advertisement

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथेआठवड्याभरापूर्वी बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, वडणगे (ता. करवीर) येथेही बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.

शनिवारी गावातील जाधव मळा आणि शिवपार्वती तलाव परिसरात बिबट्याचे अस्तित्व जाणवले असून, या ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याची माहिती करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) नंदकुमार नलवडे यांनी दिली. या घटनेमुळे वडणगे आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने वडणगे येथे दाखल झाले. या पथकाने जाधव मळा, गोसावी वसाहत आणि देवणे मळा या भागांची पाहणी केली असता, त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. काही स्थानिकांनीही बिबट्यासदृश प्राणी पाहिल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर, वडणगे ग्रामपंचायतीने आणि वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :

.