डांगमोडेत लोकवस्तीत बिबट्याचा संचार
मालवण। प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील मसुरे- डांगमोडे गावात सध्या बिबट्याचा वावर सुरु असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाला कळविल्यानंतर काल सायंकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी डांगमोडे गावाला भेट देत बिबट्याच्या वावराच्या अनुषंगाने ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मसुरे - डांगमोडे गावात सध्या बिबट्याचा वावर सुरु असून भक्ष्याच्या शोधार्थ येणाऱ्या हा बिबट्या दिवसाढवळ्या ग्रामस्थांना दिसून आला आहे.डोंगर व जंगलातून भक्ष्याच्या शोधात गावाकडील लोकवस्तीच्या ठिकाणी येणाऱ्या या बिबट्याचे दर्शन काही ग्रामस्थांना होत आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या वेळीही बिबट्याचा संचार होत असून ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत असून याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला देखील कळविले आहे. आज सायंकाळी मालवणचे वनपाल सदानंद परब तसेच आर. आर. सी पथकातील अनिल गावडे, बाबर्डेकर व इतरांनी डांगमोडे गावाला भेट देत बिबट्याच्या वावराच्या अनुषंगाने ग्रामस्थांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या