Kolhapur News : यवलूज परिसरातील शिवारात बिबट्या सदृश प्राण्याचा वावर!
यवलुजमध्ये पुन्हा बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन
माजगाव : यवलुज येथील कासारी नदीरान परिसरातील शिवारात सोमवारी सकाळी पुन्हा बिबट्या सदृश प्राण्याचा बाबर दिसून आला. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण तयार झाले आहे.
यबलूज येथील शेतकरी उत्तम आळवेकर यांचे कासारी नदी परिसरात शेत आहे. त्यांच्या पत्नी रंजना आळवेकर या शेतात कामासाठी गेल्या होत्या. त्यांवेळी त्यांना सकाळी बिबट्या सदृश प्राणी बाबासो कोले यांच्या शेतातून पुढे कासारी नदीच्या दिशेने मळीच्या पानंदमार्गे गावच्या दिशेने जात असल्याचे दिसला.
तो पुढे गेल्याची खात्री करून घाबरलेल्या अवस्थेत त्या शेतातील काम राखून घरी आल्या. त्यांनी या घटनेची माहिती त्यांचे दीर वनविभागाचे कर्मचारी दिलीप पाटील यांना दिली.
त्यांनंतर वनविभागाचे कर्मचारी संभाजी चौगले, किरण कुंभार यांनी बिबट्या सदृश प्राण्याचा माग शोधत परिसराची पाहणी केली. पण ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांनी शेतात काम करत खबरदारी घेण्याच्या अशा सूचना दिल्या.