Satara : परळी खोर्यात दोन खोंडाचा बिबट्याने घेतला बळी; शेतकऱ्यांमध्ये भिती
वेणेखोल व ताकवली मुरा येथे बिबट्याचा हल्ला
कास : परळी खोर्यातील वेणेखोल व ताकवली मुरा येथे एकाच दिवशी दोन खोंडाचा जिव बिबटयाने घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली असुन बिबटे आहेत तरी किती प्रश्न निर्माण झाला आहे
बिबट्याच्या वाढत्या दहशती पुढे परळी खोर्यातील पशुधन धोक्यात आले असुन बिबट्यांच्या संख्येचा अंदाज लावता येत नाही गेल्या महीन्याभरात पंचवीस ते तिस जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याची माहीती असली तरी त्यातील काही जनावरे बिबट्याने पळवुन नेली आहेत त्याची गणती गृहीत धरली जात नसल्याने शेतकर्यांना नुकसान सोसावे लागत आहे
शुक्रवारी एकाच दिवशी वेणेखोल येथील बाबुराव गोविंद माने याचां खोड व ताकवली मुरा येथील रामचंद्र राघु आवकीरकर यांच्या चरावयास गेलेल्या खोडांचा फडशा बिबटयाने पाडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे या बिबट्यांना रोखायचे तरी कसे असा प्रश्न पडला असुन पशुधन धोक्यात आले आहे. सदर घटनांच्या ठिकाणी रोहोट वनपाल राजाराम काशीद वनरक्षक जयंत निकम यांनी तात्काळ भेट देऊन घटनेचा पचनांमा केला आहे पंचनामा करण्यासाठी गेलेल्या वनधिकार्यांच्या वाहनाला चक्क बिबट्या अडवा गेल्याने त्यांना ही प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले त्याचे दृष्य कॅमेरॉमध्ये कैद केले आहे