For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भक्ष्याच्या शोधात बिबट्या थेट घुसला खुराड्यात

12:33 PM Jul 28, 2025 IST | Radhika Patil
भक्ष्याच्या शोधात बिबट्या थेट घुसला खुराड्यात
Advertisement

संगमेश्वर :

Advertisement

भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या थेट कोंबड्याच्या खुराड्यात घुसला. कोंबड्या फस्त केल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने बिबट्या आतमध्येच अडकून पडला. वनविभागाच्या ४ तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. ही घटना मौजे तुरळ येथे घडली.

तुरळ येथे मधुकर कुंभार आणि मनोहर कुंभार यांच्या घराच्या मागे पोल्ट्री फार्म आणि गोठा आहे. या गोठ्यातील कोबड्याना सकाळच्या दरम्याने पाहणी करण्यासाठी अवधूत कुंभार हा गेला होता. सकाळच्या दरम्यान गेलेल्या अवधुतला आतमध्ये बिबट्या अडकून पडल्याचे दिसले. त्याने ही बाब ग्रामस्थांना सांगितल्यानंतर मनसे जिल्हाप्रमुख जीतेंद्र चव्हाण यांनी परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख यांना दिली. सर्व स्टाफ, रेस्क्यू टीम पिंजरा व इतर साहित्यासह जागेवर जाऊन खात्री करता बिबट्या अडकलेला आढळून आला. या ठिकाणी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी असल्याने पोलीस निरीक्षक संगमेश्वर यांच्याशी संपर्क करून गर्दी पांगविण्यासाठी पाचारण केले.

Advertisement

त्यानंतर सदर कोंबड्याच्या खुराड्यासभोवार योग्य ती खबरदारी घेऊन शेडनेट लावले. खुराड्याच्या मुख्य दरवाजाचे तोंडावर पिंजरा लावून वरील भागात लाकडी फळ्या मारल्या. चार कंपार्टमेंटमध्ये फिरत असलेल्या बिबट्याला योग्य ती खबरदारी घेऊन ४ तासांचे अथक प्रयत्नांनंतर बिबट्यास सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद केले.

घटनास्थळी परीक्षेत्र परिमंडळ वन अधिकारी न्हाणू गावडे, वनरक्षक आकाश कडुक, वनरक्षक दाभोळे, सुप्रिया काळे, मती शर्वरी कदम, किरण पाचारणे, पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गावित, हेड कॉन्स्टेबल जाधव, अरुण वानरे, पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे व खाडे हे उपस्थित होते.

  • बघ्यांच्या गर्दीमुळे अडथळा 

मधुकर चव्हाण यांच्या पोल्ट्री फार्मला तारेचे कुंपण आहे. तसेच त्याला एका बाजूला दरवाजा आहे. बिबट्याज्यावेळी आतमध्ये शिरला त्यावेळी पिंजऱ्याचा दरवाजा आपोआप बंद झाला. त्यामुळे शनिवारी रात्रीच्या दरम्यान अडकलेला बिबट्या आतध्येच अडकून पडला होता. त्याला पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाला ४ तासाच्या प्रयत्नानंतर पकडण्यात यश आले. मोबाईल शूटिंग करणाऱ्याच्या गर्दीमुळे बिबट्याला पडण्यासाठी ४ तासांचा अवधी लागला.

Advertisement
Tags :

.