For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिबट्या चक्क मंदिरात शिरला

01:24 PM Mar 12, 2025 IST | Radhika Patil
बिबट्या चक्क मंदिरात शिरला
Advertisement

लांजा : 

Advertisement

सध्या तालुक्यात बिबटे मानवी वस्तीकडे वळू लागल्याच्या घटना सुरू असताना सोमवारी 10 मार्च रोजी तालुक्यातील आरगाव येथे एक बिबट्या चक्क हनुमान मंदिरात शिरल्याची घटना घडली. स्थानिक युवकांनी हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

आरगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या मानवी वस्तीत दिसून आला आहे. अशातच सोमवारी 10 मार्च रोजी रात्री 8.30 च्या सुमारास बिबट्या आरगाव वरीलवाडी येथील हनुमान मंदिरात शिरला होता. हा प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही तऊणांनी पाहिला. यानंतर त्यांची हबेलहंडी उडाली. मात्र त्यानंतर हा बिबट्या मंदिरात शिरून पुन्हा जंगलाकडे पळाला. बिबट्याच्या मानवी वस्ती व मंदिरात शिरण्याच्या प्रकारामुळे आरगाव वरीलवाडी येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शमिका खामकर यांनी या बाबतची माहिती लांजा येथील वनविभागाला दिली असून येथे पिंजरा लावावा आणि बिबट्याला पिंजरा बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.