For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : कापरी येथे ऊस शेतात सापडला बिबट्याचा बछडा

02:11 PM Dec 29, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   कापरी येथे ऊस शेतात सापडला बिबट्याचा बछडा
Advertisement

                    शिराळ्यात ऊस शेतात बिबट्याचा बछडा आढळून आल्याने खळबळ

Advertisement

शिराळा : कापरी ता.शिराळा येथील अविनाश आनंदराव निकम यांच्या शेतामध्ये ऊस तोडण्याचे काम चालू असताना बिबट्याचा बछडा आढळून आला. सदर घटनेची माहिती प्राणी मित्र सुशीलकुमार गायकवाड व धीरज गायकवाड यांनी मिळाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केलीसदर ठिकाणी बिबट्याचा एक बछडा असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सदर घटनेची माहिती दूरध्वनी वरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सदरचीमाहिती दिली.

यावेळी अनिल वाजे व दत्तात्रय शिंदे वनरक्षक यांना दिली. सदर बिबट पिल्लू ताब्यात घेऊन त्याला एका कॅरेट मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. रात्री याच्या आई सोबत पुनर्भेट घडवून आणण्याकरिता अनिल वाजे वनपाल, दत्तात्रय शिंदे वनरक्षक, सुशील कुमार गायकवाड, धीरज गायकवाड प्राणी मित्र व संतोष कदम रेस्क्यू टीम शिराळा यांनी कॅरेटमध्ये बिबट पिल्लास ठेऊन त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. व वनविभागाची टीम प्राणी मित्र बिबट मादीवर लक्ष्य ठेऊन आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.