For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागाव येथे उसाच्या फडाच्या आगीत होरपळून बिबट्याचा पिलाचा मृत्यू!

03:46 PM Feb 05, 2025 IST | Pooja Marathe
नागाव येथे उसाच्या फडाच्या आगीत होरपळून बिबट्याचा पिलाचा मृत्यू
Advertisement

कोल्हापूर
नागाव (ता.हातकणंगले) येथील गाडीवडर परिसरात अमित चिंतामणी सोळंकुरे यांचे शेत आहे. मंगळवारी त्यांनी आपल्या शेतातील आडसाली ऊस पेटवून तोड चालू केली होती.यावेळी ऊसाचा फड पेटवला असता शेतात लपून बसलेल्या बिबट्याने पळ ठोकल्याचे ऊस तोड मजुरांनी सांगितले. बुधवारी सकाळी शेतामध्ये शेतकरी गेले असता बिबट्याचे एक पिल्लू होरपळून मयत झाल्याचे निदर्शनास आले.त्यांनी तात्काळ ही माहिती वनविभाग व शिरोली एमआयडीसी पोलिसांना सांगितली. त्यानंतर वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा केला असता ते बिबट्याचे पिल्लू असल्याचे सांगितले. पशुधन अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन करून त्या बिबट्या चे दहन केले.यावेळी वनपाल एम.एस. पोवार, आरएफओ रमेश कांबळे, पशुधन विकास अधिकारी अश्विनी बोंगार्डे, वनरक्षक विकास घोलप, आपत्कालीन विभागाचे अमोल चव्हाण,नागाव चे पोलीस पाटील बाबासो पाटील उपस्थित होते.
यावेळी वनअधिकाऱ्यांनी या परिसरात दोन दिवस ड्रोन च्या साहाय्याने एक टीम कार्यरत ठेऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले. या पिलांच्या शोधात बिबट्या रात्री येण्याची शक्यता आहे.तसेच याची आणखीन पिल्ले या परिसरात असण्याची शक्यता आहे.सद्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी. असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या घटनेमुळे नागाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिध्द झाल्याने नागाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.