For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळेवाडचा युवक बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला

03:44 PM Jan 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मळेवाडचा युवक बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला
Advertisement

बिबट्याने केला युवकाचा पाठलाग

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून निरवडे येथे कामानिमित्त गेला होता.मात्र काल गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना घोडेमुख पायथ्या नजीकच्या मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याचीवाडी खुळादेववाडी येथे झडप घालण्याच्या तयारीत असलेला बिबट्या त्याच्या नजरेत पडला.मात्र कुत्रा असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केला.परंतु मागे वळून पाहिले तर त्याच्या मागून चक्क बिबट्या पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच त्याने गाडी जोरात पळवित मळेवाडला येत याबाबत घडलेली घटना ग्रामस्थांना दिली.आणि याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करुन माहिती दिली.मात्र घडलेली घटनेमुळे सतीश नाईक हा युवक भांबावलेला दिसत होता.सद्या सगळीकडे हे जंगली प्राणी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागले आहेत.पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत.त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत वनखात्याने तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.