For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिराळा तालुक्यात भीतीचे वातावरण

03:45 PM Dec 28, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिराळा तालुक्यात भीतीचे वातावरण
Advertisement

                          पशुधन हानीमुळे शेतकरी हवालदिल

Advertisement

शिराळा: शिराळा उत्तर भागात बिबट्याने पुन्हा पशुधनावर हल्ले सुरू केले असून शेतकरी पशुपालक मेटाकुटीला आला आहे. शुक्रवारी रात्री औंढी येथील बबन पाटील यांच्या मालकीच्या तीन शेळ्या आणि एक बोकड बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले.

पंधरा दिवसांपूर्वी शिवरवाडी येथे मादी जातीचा बिबट्या ग्रामस्थांच्या सतर्कतेने जेरबंद झाला होता.बबन पाटील यांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्या आणि बोकड बिबट्याने हल्ला करून ठार केले. पशुधनावर सातत्याने हल्ले होत असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. वनविभाग प्रयत्न करूनहीबिबट्यांवर अजूनही नियंत्रण होऊ शकले नाही.

Advertisement

उत्तर भागातील पाडळी, पाडळीवाडी, खेड बेलदारवाडी, भटवाडी, निगडी, शिरशी, गिरजवडे, करमाळे, औंढी, निगडी, एमआयडी सी परिसरात बिबट्याचा अधिवास बाढला आहे. भरदिवसा शेतकऱ्यांना बांधावर, ऊसाच्या फडात दिसतआहे. ऊसतोड सुरु असल्याने फड मोकळे होत आहेत. त्याचा परिणाम बिबटे नागरी वसाहतीत दिसून येत आहेत. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. घटनास्थळी वनपाल अनिल बाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Advertisement
Tags :

.