For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : सिद्धेश्वर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

12:07 PM Dec 26, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   सिद्धेश्वर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ  शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Advertisement

                                सादळे डोंगरात बिबट्याचा हल्ला

Advertisement

टोप : सादळे डोंगरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिद्धेश्वर सुळकी परिसरातील कुरळुपकराच्या यांच्या शेतात गुरुवारी दुपारी शेळी चारण्यासाठी गेलेल्या हनुमंत पाटील यांची एक शेळी बिबट्याने फाडून खाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले.

तसेच दोन दिवसापूर्वी याच परिसरात कुत्र्याची ही शिकार बिबट्याने केली आहे.नेहमीप्रमाणे गुरुवारी हनुमंत पाटील शेळ्या चारण्यासाठी सिद्धोबाची सुळकी येथे गेले होते. सायंकाळी घरी परतताना एक शेळी मागे राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्री दहा वाजेपर्यंत शोध घेऊनही शेळी सापडली नाही. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता ती शेळी मृत अवस्थेत आढळून आली आहे.

दरम्यान, वैरण आणण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना परिसरात बिबट्या व त्याची बछडे दिसल्याने भीती अधिकच वाढली आहे.वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. बिबट्याच्या हल्यात मृत्य झालेल्या शेळी ची नुकसान भरपाई वन विभागाणे दयावी अशी मागणी हणमंत पाटील यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.