For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : शिराळ्यात बिबट्याचा हल्ला; भावाच्या धैर्यामुळे नऊ वर्षीय बालिकेचा जीव वाचला

03:45 PM Jan 09, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   शिराळ्यात बिबट्याचा हल्ला  भावाच्या धैर्यामुळे नऊ वर्षीय बालिकेचा जीव वाचला
Advertisement

                                शिराळा तालुक्यात बिबट्याची दहशत

Advertisement

शिराळा : उपवळे (ता. शिराळा) येथे गावातील हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या नऊ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. अकरा वर्षांच्या भावाने चिरथरारकरित्या बिबट्याच्या तावडीतून सोडविल्याने बालिकेचा प्राण वाचला. स्वरांजली संग्राम पाटील (वय ९ वर्षे) रा. उपबळे (ता. शिराळा) असे जखमी बालिकेचे नाव असून तिच्याबर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जेवण झाल्यावर शेजारच्या घरात जाण्यासाठी शिवम व स्वरांजली निघाले होते. यावेळी अचानक बिबट्या आला व त्याने स्वरांजलीच्या गळ्याला पकडले.
यावेळी स्वरांजलीने अंगात स्वेटर व डोक्यास टोपी घातली होती. बिबट्याने हल्ला करताच शिवमने स्वरांजलीचा हात जोरात पकडून धरला. परंतु चिमुकल्या शिवमची ताकद अपुरी पडली, त्यामुळे स्वरांजलीचा हात सुटला. त्याने लगेच स्वरांजलीचा पाय पकडला. बिबट्याने स्वरांजलीच्या मानेला पकडले होते.

Advertisement

मात्र डोक्यावर असणाऱ्या टोपीमुळे त्याचे दात पूर्ण आत गेले नाहीत. तसेच शिवमने पाय धरून ओढल्याने बिबट्याची पकड ढिली झाली.मुलांचा आरडाओरडा ऐकून त्यांची आई स्वप्नाली धावत आल्या. त्यांनीआरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली यामुळे बिबट्या पळून गेला. या बिबट्याच्या हल्ल्यात स्वरांजलीच्या हातावर, मानेवर, पाठीवर जखमा झाल्या आहेत.

Advertisement
Tags :

.