For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Leonel Messi statue removed अखेर कोलकात्यातील मेस्सीचा ४५ फूटांचा पुतळा हलवला...

08:22 PM Jun 01, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
leonel messi statue removed अखेर कोलकात्यातील मेस्सीचा ४५ फूटांचा पुतळा हलवला
Advertisement

गेले कित्येत दिवस सुरक्षेच्या कारणास्तव वादग्रस्त ठरलेला कोलकात्यातील जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा पुतळा हटवण्यात आला. पुतळा काढल्यानंतर तो कुठे पुर्नस्थापित होणार आहे याची माहिती देण्यात आली नाही.

Advertisement

सविस्तर वृत्त असे, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय (NSCBI) विमानतळाजवळील लेक टाऊन येथे उभारण्यात आलेला अर्जेंटिनाचा फुटबॉल आयकॉन लिओनेल मेस्सीचा ४५ फूट उंचीचा पुतळा, सुरक्षेच्या कारणास्तव राज्य सरकारने सोमवारी हटवला. 

मेस्सीने स्वत: उभारला होता पुतळा

Advertisement

मेस्सीने डिसेंबर २०२५ मध्ये त्याच्या भारत दौऱ्याच्या सुरुवातीला ज्या फायबरग्लासच्या पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण केले होते, तो संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या पुतळ्याची चौथऱ्यासहित संपूर्ण रचना ७० फूट उंच होती आणि त्यात मेस्सीने फिफा विश्वचषक ट्रॉफी हातात धरल्याचे दाखवणारा हा पुतळा होता. हा पुतळा श्री भूमी स्पोर्टिंग क्लबने स्थापित केला आहे.

सुजित बोस यांच्या पुढाकाराने उभारला होता पुतळा

महापालिका संस्थांमधील भरतीतील अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी, क्लबचे अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार सुजित बोस यांना अंमलबारी संचालनालयाने (ईडी) अलीकडेच अटक केली होती.शर्मिला गुहा या स्थानिक रहिवाशाने सांगितले की, अलीकडे आलेल्या वादळात मूर्ती मुळासकट उपटली जाऊ नये म्हणून तिला आठही बाजूंनी दोऱ्यांनी बांधावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार  "सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळा डोलत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली होती. गेल्या आठवड्यात त्याला सुरक्षित करण्यासाठी दोरखंड बांधण्यात आले होते. राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनीही त्याची पाहणी केली होती. त्याची रचना असुरक्षित झाली होती.

वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यास तो कोसळू शकतो, अशी भीती लोकांना वाटत होती. सोमवारी फायबरग्लासचा पुतळा हटवण्यात आला," असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हा पुतळा बिधाननगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात हलवण्यात आला आहे. त्याचे स्थलांतर करायचे की नाही, याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement
Tags :

.