एआययुक्त कॉम्प्युटर्स आणणार लेनोवो
07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : पर्सनल कॉम्प्युटरची निर्मिती करणाऱ्या लेनोवो इंडियाने या आर्थिक वर्षामध्ये आपले पीसी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रणालीने युक्त बनवण्याचा विचार चालवला आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत पर्सनल कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये पाहता एकंदर हिस्सेदारीमध्ये 20 टक्के इतके पर्सनल कॉम्प्युटर्स ए आय प्रणालीने युक्त सादर केलेले असतील असे लेनोवो यांनी म्हटलेले आहे. अलीकडच्या काळामध्ये ग्राहकांकडून एआययुक्त पर्सनल कॉम्प्युटरची मागणी वाढलेली असून या मागणीची दखल घेऊनच कंपनी असे आधुनिक पीसी तयार करण्याच्या मोहिमेबाबत पूर्णपणे सक्रिय झाली आहे. कंपनी आपले एआययुक्त कॉम्प्युटर्स ग्राहकांकरीता उपलब्ध करेल.
Advertisement
Advertisement