लिनोवो इंडियाच्या महसुलात वाढ
06:42 AM Nov 25, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
आयटी सोल्युशन प्रदाती कंपनी लिनोवो इंडियाने दुसऱ्या तिमाहीमध्ये महसुलामध्ये 23 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये पाहता कंपनीने 1.2 अब्ज डॉलर्सचा महसूल प्राप्त केला आहे. डिजिटलीकरण व ग्राहकांच्याबाबतीत प्राप्त केलेला आत्मविश्वास या पार्श्वभूमीवर कंपनीने महसुलामध्ये वाढ केली असल्याचे पाहायला मिळाले आहे. लिनोवोचा जागतिक बाजारात पर्सनल कॉम्प्युटरमध्ये पाहता 25 टक्के इतका वाटा आहे. एआयआधारीत कॉम्प्युटर्सच्या मागणीत भारतात वाढ झाली आहे.
Advertisement
Advertisement
Next Article