For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rahul Patil यांची विधिमंडळ वाट पाहतंय, Ajit Pawar यांचे सूचक वक्तव्य

05:36 PM Aug 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
rahul patil यांची विधिमंडळ वाट पाहतंय  ajit pawar यांचे सूचक वक्तव्य
Advertisement

उपमुख्यमंत्री यांच्या वक्तव्यानंतर आमदार नरके यांची भूमिका काय असणार?

Advertisement

कोल्हापूर : राहुल पाटील हे उच्चशिक्षित असुन जि..चे अध्यक्ष म्हणून त्यांनी लक्षवेधी काम केले आहे. सहकार क्षेत्रातही ते काम करत आहेत. त्यांचे इथले काम आता संपले आहे. विधिमंडळ राहुल पाटील यांची वाट पाहत आहे, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्र्यानी राहुल पाटील यांना विधी मंडळाचा मार्ग दाखवला असला तरी त्यांचे हे वक्तव्य महायुतीमध्ये वादाची ठिणगी टाकणारे ठरु शकते. पाटील गटाचे विरोधक असणारे आमदार चंद्रदीप नरके याच विधानसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत.

Advertisement

त्यामुळे उपमुख्यमंत्री यांच्या वक्तव्यानंतर आमदार नरके यांची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. विधानसभा निवडणुक अजून बरीच लांब असली तरी करवीर विधानसभा मतदारसंघात मात्र आत्तापासूनच आमदारकीची चर्चा रंगली आहे. स्व. आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी विधीमंडळ राहुल पाटील यांची वाट पाहत आहे असे सूचक वक्तव्य केले. याच विधानसभा मतदार संघातून महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा आमदार आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे 2029 ची विधानसभा निवडणूक कशी होईल हे आत्ताच सांगता येणार आहे. मात्र निवडणूक अजून बरीच लांब असताना अजितदादांच्या वक्तव्यामुळे आत्ताच करवीरची विधानसभा चर्चेत आली आहे. दोन प्रतिस्पर्धी गट महायुतीमध्ये एकत्र करवीर विधानसभा मतदार संघातील स्व. आमदार पी. एन. पाटील आणि आमदार चंद्रदीप नरके हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले गट आता महायुतीमध्ये एकत्र आले आहेत.

कट्टर विरोधक असणाऱ्या या गटांना आता महायुतीच्या झेंड्याखाली जुळवून घ्यावे लागणार आहे. मात्रजुळवून घेण्याऐवजी आत्तापासूनच 2029 च्या आमदारकीवरुन चढाओढ निर्माण झाली आहे. आमदार चंद्रदीप नरके यांच्या भूमिकेकडे लक्ष राष्ट्रवादीमधील पक्षप्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल पाटील यांनी आमदार नरके हे आमचे पारंपरिक विरोधक राहणार असून पुढील विधानसभा त्यांच्या विरोधात लढणार असल्याचे सांगितले होते.

त्यांच्या या वक्तव्याला आमदार नरके यांनी राहुल पाटील यांनी संयम बाळगावा. त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध नाही पण त्यांचे हे वक्तव्य महायुतीमध्ये वितुष्ट आणू शकते असे उत्तर दिले होते. आता पक्षप्रवेशा दरम्यान थेट उपमुख्यमंत्र्यांनीच राहुल पाटील यांच्या आमदारकीची चर्चा केली. आता उपमुख्यमंत्री पवार यांच्या या वक्तव्याला आमदार नरके कशा पद्धतीने उत्तर देणार त्यांची भूमिका काय राहणार हे पहावे लागणार आहे.

दोन गटातील विरोध कायम राहणार?

करवीर विधानसभा मतदार संघातील प्रतिस्पर्धी असणारे पाटील-नरके गट महायुतीमध्ये एकत्र आला असला तरी दोन गटातील विरोध कायम राहणार का हे पुढील काळात स्पष्ट होईल. येथील सर्वच निवडणुका दोन्ही गटात चुरशीने होतात. कुंभी कासारी सहकारी कारखाना, यशवंत बँक अशा सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांमधील चुरस संपूर्ण जिल्ह्याने पाहिली आहे. त्यामुळे महायुतीच्या झेंड्याखाली दोन्ही गट आल्याने पुढील काळात त्यांची वाटचाल कशी असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

राहुल पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीला बळ

राहुल पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे. स्व. आमदार पी. एन. पाटील यांना करवीर विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात मानणारा मोठा वर्ग आहे. जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती, शेतकरी संघ अशा सहकारी संस्थांमध्ये त्यांचे संचालक आहेत. 250 ते 300 सेवा संस्था, दूध संस्था पाटील गटाकडे आहेत. यासर्व शक्तीस्थानांचा राष्ट्रवादीला पुढील काळात फायदा होणार आहे.

Advertisement
Tags :

.