विधिमंडळ अधिवेशन 6 ऑगस्टपासून
06:24 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
बेंगळूर :
कर्नाटक विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 6 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. बेंगळूरमधील गृहकार्यालया ‘कृष्णा’ येथे सोमवारी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार केव्हा, असा प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, 6 ऑगस्टपासून विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. मी एका दिवसाच्या कामासाठी दिल्लीला जाऊन येणार आहे. त्यानंतर आमचे नेते तीन-चार दिवसांत तारीख निश्चित करतील. नंतर पुन्हा दिल्लीला जाईन, असे सांगितले. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी मागील आठवड्यात विविध जिल्ह्यांचा दौरा करून खातेनिहाय आढावा घेतला असून अधिवेशनात या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Advertisement
Advertisement