Kolhapur : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नृसिंहवाडीतील श्री दत्तांचे घेतले दर्शन!
नृसिंहवाडी येथे राम शिंदे यांचा सत्कार
नृसिंहवाडी : "मुंबईत ठाकरे बंधूंनी सत्याचा मोर्चा काढला आहे. मात्र या मोर्चात काँग्रेसचे काही नेते सहभागी झाले नाहीत. अशा मोर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित योग्य उत्तर देतील." असे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनानिमित्त आले होते.
येथील दत्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी सभापती राम शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची माहिती जाणून घेतली. राज्यातील जनतेला व शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभू दे, अशी दत्तचरणी प्रार्थना केली असल्याचे ते म्हणाले.
सत्याचा मोर्चा व ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. यावेळी नृसिंहवाडीचे माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, माजी नगराध्यक्ष मनिषा डांगे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, सतीश मलमे, मुकुंद पुजारी, युवराज जगदाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.