For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैधकीय 'अधिकाऱ्यास' मारहाण; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

03:34 PM Dec 09, 2025 IST | NEETA POTDAR
satara news   फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैधकीय  अधिकाऱ्यास  मारहाण  कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
Advertisement

                      उपजलिहा रुग्णालय फलटण मधील एका वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण

Advertisement

by किरण बोळे 

फलटण : उपजिल्हा रुग्णालयात काल सोमवार दि. ८ रोजी एक महिला येथे औषधोपचारासाठी आली होती. त्यावेळी त्या महिलेची तपासणी करीत असताना तिच्याशी बोलताना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी तिच्याशी योग्य भाषा वापरली नाही असा त्या महिलेचा आरोप होता. त्यासंदर्भात आज मंगळवार दि. ९ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास ती महिला व तीच्या सोबत अन्य काही जण त्या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयात जाब विचारण्यासाठी आले होते. संबंधितानी डॉक्टर अविनाश गायकवाड यांच्या ओपीडी मध्ये प्रवेश करून चर्चा करण्याऐवजी त्यांच्या कानशिलात लगावल्या, यानंतर संबंधित महिला व मारहाण करणारे उपजिल्हा रुग्णालयातून निघून गेले अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

Advertisement

फलटण उपजिल्हा रुग्णालय हे गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यभरातच नव्हे तर देशामध्ये चर्चेचे ठरले आहे त्यामुळे फलटणचे नाव देखील यामुळे चर्चेचे ठरले होते अशातच पुन्हा एकदा या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्याने येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे या घटनेचा निषेध म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून संबंधित मारहाण करणारे व शिवीगाळ करणाऱ्या महिलेचा शोध घेऊन त्यांच्यावरती तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

तर हे उपजिल्हा रुग्णालय बंद करा...
फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये दारुड्यांचा गुंडांचा वावर हा नित्याचा ठरलेला आहे. दररोज अनेक जण दारू पिऊन येतात व नशेतच रुग्णालयातच झोपतात, त्यांना अटकाव केला तर शिवीगाळ खेळू जाते. त्याचबरोबर अन्य काही नित्यनेमाने येथील कर्मचाऱ्यांवर दादागिरीची भाषा वापरतात त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांमधून आमच्यावर देखील त्या वैद्यकीय अधिकाऱ्यासारखी वेळ येऊ नये अशी भीती व्यक्त करीत आहेत आणि आम्ही जो पगार घेतोय तो रुग्णांची सेवा करण्यासाठी घेतोय की मार खाण्यासाठी घेतोय असा सवाल व्यक्त करण्याबरोबरच जर येथील परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नसेल तर हे उपजिल्हा रुग्णालय बंद करा व आमच्या नेमणुका दुसरीकडे करा अशी उपहासात्मक मागणी देखील कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत रुग्णालयातील शिषेत फुटेजची तपासणी करून त्या आधारे संबंधित मारहाण करणाऱ्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर ओळख पटल्यानंतर संबंधितावर गुन्हा नोंद होणार का किंवा याबाबत सदर वैद्यकीय अधिकारी तक्रार दाखल करणार का याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झाली नाही.

Advertisement
Tags :

.