For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘जेएनयू’ निवडणुकीत डाव्या उमेदवारांची बाजी

06:25 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘जेएनयू’ निवडणुकीत  डाव्या उमेदवारांची बाजी
Advertisement

विद्यार्थी संघटनेची चारही पदे जिंकली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्या उमेदवारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. डाव्या पक्षाचे धनंजय अध्यक्षपदी तर अविजित घोष उपाध्यक्षपदी विजयी झाले आहेत. सुऊवातीच्या टेंडमध्ये एबीव्हीपी चारही जागांवर आघाडीवर होती, परंतु मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात डाव्यांनी आघाडी घेतली.

Advertisement

जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डावे उमेदवार धनंजय यांना एकूण 2,598 मते मिळाली. तर अभाविपचे उमेदवार उमेशचंद्र अजमिरा यांना 1,686 मते मिळाली. याशिवाय उपाध्यक्षपदासाठी डावे उमेदवार मोठ्या मताधिक्मयाने विजयी झाले. अविजित घोष यांना 2,409 आणि अभाविप उमेदवार दीपिका शर्मा यांना 1,482 मते मिळाली.

विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत सरचिटणीसपदासाठी उभे असलेले अर्जुन आनंद (अभाविप) यांना एकूण 1,961 मते मिळाली. तर प्रियांशी आर्या 2,887 मते मिळवून विजयी झाल्या. तर सहसचिव पदासाठी निवडणूक लढवणारे गोविंद डांगी (अभाविप) यांना 2,066 मिळाली. मात्र, मोहम्मद साजिद (डावे) यांनी एकूण 2,575 मते मिळवून विजय मिळवला.

Advertisement
Tags :

.