कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘जेएनयू’मध्ये पुन्हा डाव्या आघाडीची सरशी

07:00 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विद्यार्थी संघटनेच्या चारही पदांवर विजय

Advertisement

अध्यक्ष : अदिती मिश्रा (लेफ्ट युनायटेड)

Advertisement

उपाध्यक्ष : के. गोपिका (लेफ्ट युनायटेड)

सरचिटणीस : सुनील यादव (लेफ्ट युनायटेड)

संयुक्त सचिव : दानिश (लेफ्ट युनायटेड)

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा डाव्या आघाडीनेच (लेफ्ट युनायटेड) सर्व पदांवर विजय मिळवला आहे. अदिती मिश्रा अध्यक्षपदी, के. गोपिका उपाध्यक्षपदी, सुनील यादव सरचिटणीसपदी आणि दानिश संयुक्त सचिवपदी विजयी झाले. या सर्व पदांवर लेफ्ट युनायटेडच्या उमेदवारांनी अपवादात्मक कामगिरी करत विजय संपादन केला. गुरुवारी सायंकाळी निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आले. गेल्यावेळीही डाव्यांनी एक जागा वगळता सर्व जागा जिंकल्या होत्या.

जेएनयू कॅम्पसमध्ये मतमोजणीदरम्यान थोडी तणावपूर्ण परिस्थिती दिसून आली. मतमोजणी क्षेत्राजवळ डाव्या एकतेच्या काही सदस्यांमध्ये किरकोळ हाणामारी झाली. तथापि, कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे परिस्थिती सामान्य करण्यात यश आले. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका मंगळवारी झाल्या होत्या. पूर्वनियोजनानुसार गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीपासून मतमोजणी प्रक्रियेवर डावी आघाडी वर्चस्व गाजवताना दिसत होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव या पदांवर डावे आघाडीवर होते. तथापि, सरचिटणीस पदासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू होती. अखेरीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) डाव्यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यात अपयशी ठरली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article